Join us

मैदानातून २१८ जणांची माघार

By admin | Published: April 11, 2015 1:33 AM

महापालिका निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या ८८७ उमेदवारांपैकी २१८ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. ६६९ अर्ज शिल्लक असून उमेदवारांची अंतिम यादी

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या ८८७ उमेदवारांपैकी २१८ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. ६६९ अर्ज शिल्लक असून उमेदवारांची अंतिम यादी शनिवारी निश्चित होणार आहे. शिवसेनेमध्ये सर्वाधिक बंडखोर असून ठाणे जिल्ह्णाचे पालकमंत्री व उपनेत्यांचे आवाहन शिवसैनिकांनी धुडकावून लावले आहे. यामुळे युतीची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या बंडखोरांवर कारवाई करण्याचे संकेत पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत. लवकरच त्यांची हकालपट्टी होऊ शकते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी बंडखोरांना शांत करण्यासाठी धावपळ केली होती. शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. ठाणे जिल्ह्णाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपनेते विजय नाहटा दोन दिवसांपासून सर्व बंडखोरांना फोन करून अर्ज मागे घेण्याचे आवाहन करत होते. अनेकांना स्वीकृत नगरसेवक व इतर समित्यांवर घेण्याचे गाजर दाखविले जात होते. परंतु संतापलेल्या शिवसैनिकांनी या गाजराची पुंगी वाजवून अर्ज मागे घेण्यास सपशेल नकार देऊन बंडखोरी कायम ठेवली. यामध्ये नगरसेवक सुरेश भिलारे, सतीश रामाणे, माजी जिल्हाप्रमुख हरिभाऊ म्हात्रे यांच्यासह सुरेंद्र मंडलिक, संतोष मोरे, सुनील हुंडारे, दर्शन भणगे, संदीप राजपूत, संतोष दळवी, घणसोलीतील घनशाम मढवी यांच्या पत्नी ललिता मढवी, नामदेव जगताप, सीमा जगताप, अरुण गुरव यांची पत्नी वइतर अनेक उमेदवारांचा समावेश आहे. यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. (प्रतिनिधी)