Join us  

मिठी सफाईसाठी २२ कोटी

By admin | Published: January 26, 2016 2:15 AM

घोटाळेबाज ठेकेदारांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची तयारी पालिकेने केल्यानंतर नाल्यांच्या सफाईचा प्रश्न उभा राहिला आहे़ मिठीच्या सफाईची कमी बोलीची निविदाही प्रशासनाने मंजूर केली आहे़

मुंबई : घोटाळेबाज ठेकेदारांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची तयारी पालिकेने केल्यानंतर नाल्यांच्या सफाईचा प्रश्न उभा राहिला आहे़ मिठीच्या सफाईची कमी बोलीची निविदाही प्रशासनाने मंजूर केली आहे़ मात्र यातील चारपैकी तीन कामे एकाच कंपनीला देण्यात येत असल्याने पुन्हा एकदा संशयाची पाल चुकचुकली आहे़ महापालिकेने २३ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करत नाल्यांच्या सफाईसाठी पुनर्निविदा मागवल्या़ मात्र यामध्ये ५१ कामांपैकी केवळ २५ कामांनाच प्रतिसाद मिळाला़ त्यातही ठेकेदारांनी ८० ते ३३९ टक्के जादा दराने बोली लावली़ मिठीसाठी २२ कोटी रुपयांचे कंत्राट पालिकेने दिले आहे़ नालेसफाईसाठी फेरनिविदा मागविण्यात आल्या आहेत. कामाच्या अनुभवाची अटही शिथिल करण्यात आली आहे़ मालकीची यंत्रसामग्री नसलेल्यांनाही यात भाग घेता येणार आहे. (प्रतिनिधी)