कुरारमध्ये मृत्यूचा तांडव ! संरक्षक भिंत कोसळून 22 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 11:26 PM2019-07-02T23:26:22+5:302019-07-02T23:26:42+5:30

पन्नासहून अधिक जखमी; उशीरा रात्रीपर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू

22 deaths due to protection wall collapse in mala kurar area | कुरारमध्ये मृत्यूचा तांडव ! संरक्षक भिंत कोसळून 22 जणांचा मृत्यू

कुरारमध्ये मृत्यूचा तांडव ! संरक्षक भिंत कोसळून 22 जणांचा मृत्यू

googlenewsNext

मुंबई - मालाड येथील कुरार परिसरातील पिंपरीपाड्यात सोमवारी पडणाऱ्या मुसळधार पावसात नॅशनल पार्कजवळ असलेली बारा फुटांची उंच भिंत अचानक कोसळली. गाढ झोपेत असताना बेसावध अवस्थेत मृत्यूने स्थानकांवर झडप घातली आणि आतापर्यंत 22 लोकांचा यात बळी गेला. मृत्यूच्या या तांडवात ढिगाऱ्याखाली घुसमटून मृत झालेल्या आपल्याच माणसांचे छिन्नविच्छिन्न मृतदेह पाहण्याची वेळ इथल्या स्थानिकांवर आली आणि अख्खी मुंबईच या घटनेमुळे सुन्न झाली.

सोमवारी रात्री साडे बाराच्या सुमारास पिंपरीपाड्यात असलेली ही संरक्षक भिंत कोसळली. काही लोकांनी हा प्रकार पहिला आणि आरडाओरडा करत अन्य लोकांना सतर्क केले. या घटनेचा मेसेज मध्यरात्री व्हायरल झाल्यावर कुरार पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच माध्यमाच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. बाहेर पडण्यासाठी काहीच वाव नसल्याने मृत्यूच्या दाढेत लहान मुले, महिला आणि पुरुष अडकुन पडले. मुसळधार पाऊस आणि काळोख त्यातच उघड्यावर पडलेल्या विजेच्या तारा यामुळे अडकलेल्याची मदत करण्यात बरेच अडथळे निर्माण झाले होते. अग्नीशमन दल, डॉग स्कॉड आणि एनडीआरएफ पथकाच्या कामात बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेणारे नातेवाईक व माध्यम प्रतिनिधींचा अडथळा होत होता. ढिगारा उपसत असताना पाऊसाचा जोर वाढल्याने मातीखाली गाडले जाऊन मृतांचा आकडा वाढला. त्यानंतर जवळपास दिवसभर बचावकार्य सुरू ठेवत 22 मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र तरी अनेक जण बेपत्ता असल्याने त्यांचा शोध आधुनिक यंत्रांच्या मदतीने घेण्याचा प्रयत्न केला जात होता. याठिकाणी स्थानिक सुशांत डोंगरे, सुशांत चोपडेकर, अमित नाईक, राकेश डिके, राज चौबे, सिद्धार्थ सावंत, चेतन रंगले, यश पाटील, अक्षय चोपडेकर, विशाल यादव, यश दरेकर, मनीष कांबळे, श्रेयस जांभळे, अमोल चव्हाण, ऋषिकेश धोके, अमोल गुरव, आणि सनी विश्वकर्मा या तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. या दुर्घटनेत एकूण 79 जणांना वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी 22 जणांचा मृत्यू तर 15 जणांना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आणि उर्वरित 42 जणांवर उपचार सुरू आहे.

दादा, भिंतपडली ....

'पावसाचा जोर वाढत असल्याने आणि लादीमधून कारंजे फुटल्याने आमच्या घरात गुडघाभर पाणी जमा झाले होते. त्यामुळे आम्ही रात्री जागे होतो. त्यावेळी एक तरुण घाबराघुबऱ्या अवस्थेत धावत त्याठिकाणी आला आणि 'दादा, भिंत पडली', असे सांगत अक्षरशः रडू लागला. मी आणि माझे मित्र काही वेळा पुर्वीच घरी पोहोचलो होतो. त्यामुळे आम्ही काही गाड्या घेऊनच घटनास्थळी गेलो आणि आमच्या पायाखालची जमिनच सरकली. नेमके काय घडले याचा अंदाज आला आणि आम्ही तडक बचावकार्य सुरू केले. सर्वात आधी तिघांना आम्ही त्या ढिगाऱ्यातुन बाहेर काढुन मित्राच्या गाडीने रुग्णालयासाठी रवाना केले त्यांनतर रात्रभर आणि मंगळवारी पुर्ण दिवस आम्ही बचावकार्यात अग्निशमन दलाला मदत करत होतो. मात्र १०८ वर फोन करून देखील त्यांच्याकडून आम्हाला योग्य ती मदत मिळाली नाही. - 

सुमीतमुळेकर ( अपघाताचाप्रत्यक्षदर्शी )

 

तेरा- चौदागाड्यामदतकार्यातवापरल्या!

'मी नुकताच कामावरून घरी परतलो होतो. तेव्हा आमच्या चाळीत धावपळ सुरू झाली. काही तरी गडबड आहे याचा अंदाज आला आणि मी न जेवताच घराबाहेर आलो. तेव्हा पिंपरीपाड्यात भिंत कोसळुन अनेक लोक अडकल्याचे समजले. क्षणाचाही विलंब न लावता मी माझ्या अन्य मित्रांना धडाधड फोन केले आणि शक्य होईल तितक्या लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढत गाडीत बसवुन रुग्णालयात पाठवले. - 

मनीष कांबळे ( प्रत्यक्षदर्शी)

Web Title: 22 deaths due to protection wall collapse in mala kurar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.