लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २२ वसतिगृह लवकरच सुरू करण्यात येतील तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आधार योजना प्रस्तावित आहे, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.
शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांची संख्या ५० वरून ७५ज्यांना वसतिगृह उपलब्ध होणार नाही अशा मुंबई शहर, उपनगर, ठाणे,पुणे, पिंपरी चिंचवड,नागपूर या भागातील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक ६०,००० रुपये निर्वाह भत्ता देण्यात येईल. उर्वरित महापालिका क्षेत्रासाठी ५१ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी ४३ हजार असे नियोजन केले आहे. परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी १० असलेली संख्या ५० केली असून ही संख्या ७५ पर्यंत नेऊ, असेही मंत्री सावे म्हणाले.