Join us

Coronavirus: मुंबईतील सेंट जोसेफ बॉर्डिंग स्कूलमधल्या २२ जण कोरोना पॉझिटिव्ह; BMC नं केलं सील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 7:27 PM

देशातील ४१ जिल्ह्यात कोरोना संक्रमण दर १० टक्क्याहून जास्त आहे. देशात कोविड १९ ची दुसरी लाट अद्यापही जारी आहे.

मुंबई – शहरातील आग्रीपाडा येथे असणाऱ्या जोसेफ अनाथ आश्रममध्ये राहणाऱ्या १५ मुलांसह २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ४ मुलं १२ वर्षापेक्षा कमी वय आहे. ज्यांना मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. तर १२ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांना रिचर्ड्सन अँन्ड क्रूडस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

चाचणी शिबिरात आलं समोर

अनाथ आश्रममध्ये कोरोना तपासणीसाठी शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी ९५ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत अशी माहिती नायर हॉस्पिटलचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ लोकांपैकी ११ जण असे आहेत की, ज्यांचे वय १२ ते १८ वयोगटातील आहेत. या सर्वांना रिचर्ड्सन एँड क्रूड्स हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्याशिवाय ७ वयस्क लोकांनाही याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. बीएमसीने खबरदारी म्हणून या इमारतीला सील केले आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबर महिना खूप महत्त्वाचा

देशातील ४१ जिल्ह्यात कोरोना संक्रमण दर १० टक्क्याहून जास्त आहे. देशात कोविड १९ ची दुसरी लाट अद्यापही जारी आहे. दुसरी लाट संपली नाही. त्यामुळे लोकांना सतर्क राहणं गरजेचे आहे. विशेषत: सण-उत्सवानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिना देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या काळात देशात अनेक ठिकाणी उत्सव आहेत. त्यामुळे कोविडचे नियम पाळूनच उत्सव साजरे केले पाहिजेत असं आवाहन त्यांन केले.

तसेच कोविड १९ विरुद्ध लसीकरण हे कोरोना प्रसार रोखण्यासाठी आहे. रोग बरा करण्यासाठी नाही. त्यामुळे लसीकरणानंतरही लोकांनी मास्कचा वापर करायला हवा. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका दिवसात कोरोना व्हायरसचे ४६ हजार १६४ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर भारतातील कोविड १९ एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २५ लाख ५८ हजार ५३० झाली आहे. सकाळी ८ च्या आकडेवारीनुसार ६०७ लोकांच्या मृत्यूनंतर देशभरात मृतांची संख्या ४ लाख ३६ हजार ३६५ इतकी झाली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका