राज्यात कोरोनाचे २२, तर मुंबईत १० नवे रुग्ण
By संतोष आंधळे | Published: January 22, 2024 08:49 PM2024-01-22T20:49:55+5:302024-01-22T20:50:06+5:30
कोरोनाचे रुग्ण कमी होतायेत
मुंबई : राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये सोमवारी राज्यात एकूण २२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील १० रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. त्यामुळे राज्यात ४२२ आणि मुंबईत १२९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आज ३२ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत जे १० रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी कोणत्याही रुग्णाला आज रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाकरिता राखीव असणाऱ्या ४२१५ बेड्सपैकी १४ बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात १७९ चाचण्या करण्यात आल्या. ‘जेएन १’ या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
नव्याने नोंद झालेले महामुंबईतील रुग्ण
मुंबई मनपा - १०
ठाणे मनपा - ५
नवी मुंबई मनपा - १