मरेवर तोडफोड, दगडफेक करणारे २२ जण अटकेत
By Admin | Published: January 4, 2015 02:30 AM2015-01-04T02:30:13+5:302015-01-04T02:30:13+5:30
दिवा रेल्वे स्थानकात शुक्रवारी प्रवाशांकडून झालेल्या आंदोलनाप्रकरणी आतापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आली आहे. यात डोंबिवलीतील तोडफोड प्रकरणात चौघांना तर मुंब्रा पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे.
ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात शुक्रवारी प्रवाशांकडून झालेल्या आंदोलनाप्रकरणी आतापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आली आहे. यात डोंबिवलीतील तोडफोड प्रकरणात चौघांना तर मुंब्रा पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे.
दिव्यातील रेल्वे रोकोमुळे तब्बल सहा तासांपेक्षा अधिक काळ मध्य रेल्चेचा खोळंबा झाला होता. डोंबिवली स्थानकांत तिकीट घरासह एटीव्हीएम मशिनची तोडफोड केली होती. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी चौघाजणांना अटक केलीे. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासात त्यांचा या घटनेतील सहभाग उघड झाला असल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे.
दिव्यातील तोडफोड प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी १८ जणांना अटक केली. तसेच याप्रकरणी आणखी काहींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मनेरे यांनी दिली.
शुक्रवारच्या घटनेत पोलिसांनी प्रवाशांवर/जमावावर जो लाठीचार्ज केला़ त्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.
च्रेल्वेच्या खोळंब्यानंतर अव्वाच्या सव्वा भाडे आकारून त्यांची लूट करणाऱ्या रिक्षाचालकांच्या चौकशीचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत.
च्यासंदर्भात डोंबिवलीकरांनी तक्रार केल्यावर रावते यांनी तातडीने शनिवारी येऊन येथील रामनगर पोलीस ठाण्यात बैठक बोलावली.
च्किती अनधिकृत रिक्षा आहेत, ती तरी आकडेवारी द्या, चौकशी-तपासणी करा, असे आदेशही त्यांनी दिले.