कोकणात २२ स्थानकांची होणार उभारणी

By Admin | Published: February 20, 2017 06:25 AM2017-02-20T06:25:08+5:302017-02-20T06:25:08+5:30

कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू असले तरी काही भागात दुपदरीकरणासाठी नव्याने रेल्वे स्थानकांची

22 stations to be set up at Konkan | कोकणात २२ स्थानकांची होणार उभारणी

कोकणात २२ स्थानकांची होणार उभारणी

googlenewsNext

अमुलकुमार जैन / बोर्ली-मांडला
कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू असले तरी काही भागात दुपदरीकरणासाठी नव्याने रेल्वे स्थानकांची निर्मिती केली जाणार आहे. कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू असले तरी काही भागात दुपदरीकरणासाठी नव्याने रेल्वे स्थानकांची निर्मिती केली जाणार आहे. संपूर्ण मार्गावर नव्याने २२ स्थानकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न राहणार असून १४० किमीच्या कामासाठी जवळपास ४५०० कोटी निधीची आवश्यकता असल्याची माहिती कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी दिली.
नव्याने मंजुरी मिळालेल्या नऊ रेल्वे स्थानकांच्या कामाला लवकरच सुरु वात केली जाणार आहे. या स्थानकांच्या कामांची निविदा प्रक्रि या करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. रोहा ते वीर या मार्गावर हे काम सुरू आहे. या मार्गावरील संगमेश्वर ते विलवडेदरम्यान दुपदरीकरणाचे काम करणे शक्य नाही. कारण या मार्गावर बोगदे आणि पुलांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे याठिकाणी दुपदरीकरणासाठी नव्याने मार्ग निर्माण करावे लागेल. ते काम खूप अवघड आहे.
वैभववाडीपासून पुढे कोकण रेल्वे मार्गावर बोगदे, पुलांची संख्या नगण्य आहे. हा मार्ग दुपदरीकरणासाठी योग्य असल्याने या ठिकाणी हे काम शक्य होऊ शकते. याकरिता कोकण रेल्वे मार्गावरील काही भागात दुपदरीकरणाच्या कामासाठी नव्याने रेल्वे स्थानकांची निर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे. २२ स्थानकांच्या निर्मितीचा कोकणवासीयांना नक्कीच फायदा होणार असून त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर नव्याने २२ स्थानकांची निर्मिती होऊ शकते. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या नऊ स्थानकांच्या कामांना लवकरच सुरु वात केली जाणार आहे. या कामांची निविदा प्रक्रि या हाती घेण्यात आली असून नजीकच्या काळात हे काम सुरू होईल.
- बाळासाहेब निकम,
विभागीय व्यवस्थापक,कोकण रेल्वे

Web Title: 22 stations to be set up at Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.