Join us

धरिला सायकल चोर... नवघर पोलिसांनी जप्त केल्या २२ सायकली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 7:32 PM

पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालचे , कवडे , भालेराव , शिंदे , गिरगावकर यांच्या पाथकाने  बातमीदारां कडून माहिती गोळा करत तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नालासोपाऱ्याच्या संतोष भवन मध्ये राहणाऱ्या राजू विजय चोहान ह्या ५० वर्षीय आरोपीस अटक केली

ठळक मुद्देपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालचे , कवडे , भालेराव , शिंदे , गिरगावकर यांच्या पाथकाने  बातमीदारां कडून माहिती गोळा करत तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नालासोपाऱ्याच्या संतोष भवन मध्ये राहणाऱ्या राजू विजय चोहान ह्या ५० वर्षीय आरोपीस अटक केली .

मीरारोड - लहान मुलांच्या सायकल चोरणाऱ्या नालासोपारा येथील चोरास नवघरपोलिसांनी अटक केली असून त्याच्या कडून चोरीच्या २२ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत . चोरीला गेलेल्या सायकल परत मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. मुलांच्या सायकल चोरीच्या घटना शहरात वाढल्याने मुलं व पालकां मध्ये नाराजीचे वातावरण होते . पोलिसांनी देखील ह्या सायकल चोरीचे गांभीर्य ओळखून नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक सायकल चोरांचा छडा लावण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नेमले होते.

पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालचे , कवडे , भालेराव , शिंदे , गिरगावकर यांच्या पाथकाने  बातमीदारां कडून माहिती गोळा करत तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नालासोपाऱ्याच्या संतोष भवन मध्ये राहणाऱ्या राजू विजय चोहान ह्या ५० वर्षीय आरोपीस अटक केली . पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने तब्बल २२ सायकली चोरल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी सदर १ लाख २३ हजार रुपये किमतीच्या २२ सायकली जप्त केल्या आहेत. बहुतांशी सायकल ह्या इमारतीच्या आवारातून त्याने चोरलेल्या आहेत . त्याच्यावर बोरिवली, कांदिवली, दहिसर भागात सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :चोरपोलिस