२२ हजार ६०३ मीटर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:08 AM2021-08-14T04:08:58+5:302021-08-14T04:08:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या महिन्यांपासून राज्यात वीज मीटर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून, १ लाख ४० ...

22 thousand 603 meters down | २२ हजार ६०३ मीटर डाऊन

२२ हजार ६०३ मीटर डाऊन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या महिन्यांपासून राज्यात वीज मीटर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून, १ लाख ४० हजार २८८पैकी २२ हजार ६०३ मीटरमधील वीजवापर विविध कारणांमुळे चुकीचा नोंदविल्याचे आढळले आहे. हे मीटर बदलून प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे अचूक वीजबिल देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे शून्य ते ३० युनिटपर्यंत सुरू असलेल्या वीजवापराची खात्री करण्यासाठी मोहीम सुरू आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

-------------------------

घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ४२ लाख ९३ हजार वीजग्राहक दरमहा शून्य ते ३० युनिटपर्यंत विजेचा वापर करत आहेत. हे ग्राहक शहरी, निमशहरी भागातील आहेत. कमी वीज वापर असल्याने खात्री करण्यासाठी तपासणीची मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले.

- विजय सिंघल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण

-------------------------

प्रत्यक्षात तपासणी

घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजमीटरची क्षेत्रीय पथकांनी प्रत्यक्षात तपासणी केल्यानंतर २२ हजार ६०३ मीटरमध्ये विविध कारणांनी योग्य रिंडिग होत नसल्याचे दिसले. ८४९ मीटरमध्ये ग्राहकांनी फेरफार केल्याचे आढळल्याने त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली.

-------------------------

वापराप्रमाणे बिल येणार

मीटरची गती संथ असणे, मीटर बंद असणे, डिस्प्ले नसणे, योग्य भार नसणे आदी सदोष प्रकार उर्वरित मीटरमध्ये आढळून आले आहेत. हे सर्व मीटर बदलण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रत्यक्ष वापराप्रमाणे वीजबिल देण्यात येत आहे.

-------------------------

- ग्राहकांना प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे अचूक बिल देण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे मीटर रिडिंग सुरू.

- कंत्राटदारांकडून मीटर रिडिंग योग्य प्रकारे होत असल्याची खातरजमा करण्यासाठी दरमहा २ टक्के रिडिंगचे पर्यवेक्षण

- मोहिमेमुळे वीज ग्राहकांना अचूक वीजबिल देण्यास गती मिळणार

- जादा युनिटचे वीजबिल आल्यास वीजग्राहकांकडून तक्रारी

- कमी युनिटचे वीजबिल येत असल्यास ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण अत्यल्प

- मीटर बदलून दिल्यानंतर वीजबिलात मागील वीजवापराच्या युनिटचे नियमाप्रमाणे समायोजन

- दोषी आढळलेल्या संबंधीत मीटर रिडिंग एजन्सीविरूद्ध कारवाई

.........................................

शून्य ते ३० युनिटपर्यंत वीजवापर, तपासणी आणि वीज मीटरमध्ये अनियमितता

औरंगाबाद प्रादेशिक विभाग - २९ हजार ४०७पैकी ६ हजार ४९१

कोकण प्रादेशिक विभाग - ५२ हजार २१४पैकी ६ हजार ९२०

नागपूर प्रादेशिक विभाग - ३८ हजारपैकी ५ हजार १९०

पुणे प्रादेशिक विभाग - २० हजार ६६५पैकी ४ हजार

Web Title: 22 thousand 603 meters down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.