समृद्धी महामार्गाचे २२ टक्के काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 03:19 AM2019-11-29T03:19:58+5:302019-11-29T03:20:32+5:30

मुंबई- नागपुर या समृध्दी महामार्गाच्या कामाला आता गती आली आहे. या दोन मोठी शहरे जोडण्याच्या या योजनेसाठी भूखंड अधिग्रहणाचे काम आता पूर्ण करण्यात आले आहे.

22% work done on the Samrudhi highway | समृद्धी महामार्गाचे २२ टक्के काम पूर्ण

समृद्धी महामार्गाचे २२ टक्के काम पूर्ण

Next

मुंबई : मुंबई- नागपुर या समृध्दी महामार्गाच्या कामाला आता गती आली आहे. या दोन मोठी शहरे जोडण्याच्या या योजनेसाठी भूखंड अधिग्रहणाचे काम आता पूर्ण करण्यात आले आहे. ७०१ किमी लांबीच्या महामार्गाचे २२ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. या संपूर्ण मार्गिकेवर ३०० किमी लांबीचा कच्चा रस्ता तयार करण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.

हा महामार्ग मुंबईला जोडण्यासाठी इगतपुरी येथे भुयारी रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या संपुर्ण मार्गिकेसाठी ५५ हजार ४७७ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून सर्वात अत्याधुनिक हाईवेचे निर्माण करण्यात येणार आहे. हा महामार्ग तयार झाल्यावर मुंबई ते नागपूर असा प्रवास अवघ्या आठ तासांमध्ये करणे शक्य होणार आहे. सध्या या मार्गावर प्रवास करताना सुमारे १३ ते १५ तासांचा अवधी लागतो.

३०० पेक्षा अधिक पूल
राज्याच्या सर्वात मोठ्या महामार्गावर ३०० पेक्षा अधिक लहान मोठे पूल असणार आहेत. या महामार्गावर २४० लहान पूल तर ५४ उड्डाणपूल आणि २८ मोठे पूल तयार करण्यात येणार आहेत. या सर्व लहान मोठ्या पुलांच्या कामाला सुरूवात झाली आहे. हा महामार्ग १४ जिल्ह्यांमधून जाईल. यामुळे अप्रत्यक्षपणे १० जिल्ह्यांसहीत एकूण २४जिल्ह्यांना लाभ होईल.

२४ ठिकाणी इंटरचेंज
समृद्धि महामार्गावर सुरक्षित यात्रेसाठी दोन्ही बाजुने भिंत बांधण्यात येणार आहे. याची लांबी १४०० किमी पेक्षा जास्त असणार आहे. संपूर्ण मार्गावर २४ ठिकाणी इंटरचेंजची सुविधा असणार आहे.

१६ पॅकेजमध्ये होणार काम
७०१ किमी लांबीच्या महामार्गाचे १६ पॅकेजमध्ये विभाजित करण्यात आले आहे. राज्य सरकारने या मोठ्या महामार्गाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) सोपवली आहे. या १६ पॅकेजमध्ये काम करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपुर्ण मार्गिकेपैकी २२ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. जमीन अधिग्रहण करून शेतकऱ्यांना बाजार भावापेक्षा जास्त भरपाई देण्यात आली आहे.


१६ पॅकेजमध्ये होणार काम
७०१ किमी लांबीच्या महामार्गाचे १६ पॅकेजमध्ये विभाजित करण्यात आले आहे. राज्य सरकारने या मोठ्या महामार्गाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) सोपवली आहे. या १६ पॅकेजमध्ये काम करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपुर्ण मार्गिकेपैकी २२ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. जमीन अधिग्रहण करून शेतकऱ्यांना बाजार भावापेक्षा जास्त भरपाई देण्यात आली आहे.
 

Web Title: 22% work done on the Samrudhi highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.