खड्डेमय रस्त्यांसाठी आता २२३ कोटींचा मुलामा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 02:02 AM2018-12-04T02:02:38+5:302018-12-04T02:02:46+5:30

मोठमोठे दावे करून आणलेले कोल्डमिक्सही मुंबईला खड्डेमुक्त करण्यात अपयशी ठरले आहे.

223 crores of machets for paved roads now | खड्डेमय रस्त्यांसाठी आता २२३ कोटींचा मुलामा

खड्डेमय रस्त्यांसाठी आता २२३ कोटींचा मुलामा

मुंबई : मोठमोठे दावे करून आणलेले कोल्डमिक्सही मुंबईला खड्डेमुक्त करण्यात अपयशी ठरले आहे. या मिश्रणाच्या वापरावरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये युद्ध रंगले असताना आता रस्त्यांच्या दुरुस्तीवर आणखी प्रयोग होणार आहेत. त्यानुसार रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरणाची तब्बल २२३ कोटी रुपयांची कामे सुरू होणार आहेत.
मुंबई खड्डेमुक्त करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. या मोहिमेंतर्गत आराखडा तयार करून मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. मात्र रस्ते घोटाळा उघड झाल्यानंतर या कामांना ब्रेक लागला होता. मात्र या वर्षी महापालिकेने तब्बल एक हजार रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. यापैकी काही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात आली. तर पाचशेहून अधिक रस्त्यांची कामे आॅक्टोबर महिन्यापासून सुरू झाली.
रस्त्यांचे डांबरीकरण पुन:पृष्ठीकरण करणे, सिमेंट काँक्रीटीकरण आणि रस्ते पदपथांची दुरुस्ती करणे, लहान रस्त्यांची पक्की फरसबंदी करणे आदी कामे या अंतर्गत होणार आहेत. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ८९ कोटी, डांबरीकरण-पुन:पृष्ठीकरण १९ कोटी आणि डांबरीकरणाची ४८ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. रस्त्यांची पक्की फरसबंदी करणे, पदपथ दुरुस्ती, पॅसेजचे सिमेंट काँक्रीटीकरण आदी ४२ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
>रस्ते दुरुस्तीची कामे
एल विभाग - छोटे रस्ते सुधारणा - एक वर्षाचे कंत्राट - ३३ रस्ते - २५.७६ कोटी
पी उत्तर विभाग - मालाड पश्चिम - सिमेंट काँक्रीट - एक वर्षाचे कंत्राट - ३३ रस्ते - २५.३६ कोटी.
के पूर्व - अंधेरी-घाटकोपर जोड रस्ते ते लोकभारती जंक्शन - सिमेंट काँक्रीट - एक वर्षाचे कंत्राट - १२.९६ कोटी.
आर मध्य - बोरीवली एस.व्ही. रोड पदपथ दुरुस्ती - १६ महिने - ४२.३१ कोटी.
आर दक्षिण - रिर्स्फेसिंग - ७ महिने - ७.९९ कोटी.
के पूर्व - छोटे रस्ते - एक वर्ष - १८.३३ कोटी, मुख्य रस्ते - सात महिने - १०.८ कोटी
पी उत्तर - मालाड पूर्व - सिमेंट काँक्रीटचे रस्ते - एक वर्षाचे कंत्राट - २१.१३ कोटी रुपये
आर उत्तर - रिर्स्फेसिंग - ७ महिने - २.४२ कोटी.

Web Title: 223 crores of machets for paved roads now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.