मुंबई : वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या २२३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आॅनलाइन अर्ज महापालिकेने फेटाळले आहेत. तरीही या मंडळांनी मंडप उभारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, आॅनलाइन अर्जाची मुदत २ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमांनुसार या वर्षी गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी आॅनलाइन परवानगी देण्यात येत आहे. गणेशोत्सव मंडळांची गैरसोय टाळण्यासाठी हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही प्रकिया संथगतीने सुरू असल्याने अर्जाची मुदत दुसºयांदा वाढविण्यात आली आहे. मंडळांना आता २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. गणेश मंडपासाठी आतापर्यंत दोन हजार ६९४ मंडळांचे अर्ज महापालिकेकडे आले होते. त्यापैकी एक हजार ४२५ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. ५९४ मंडळांनी दोनदा परवानगीसाठी अर्ज केले होते, अशा मंडळांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. ११५ गणेश मंडळांना पुन्हा अर्ज करता येणार असल्याचे ते म्हणाले.न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईवाहतुकीस अडथळा आणि न्यायालयीन आदेश, अशा विविध कारणांमुळे मुंबईतील २२३ गणेश मंडळांना या वर्षी मंडपाची परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही या मंडळांनी बेकायदा मंडप बांधल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पालिका उपायुक्त (परिमंडळ २) नरेंद्र बरडे यांनी सांगितले. बेकायदेशीर मंडपांवर कारवाई केली नाही, तर न्यायालयाचा अवमान होईल, अशी भीती महापालिका अधिकाºयांना आहे. २२३ गणेश मंडळांना मंडपाची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यात ७६ मंडळांना पोलिसांनी, तर ३२ मंडळांना पालिकेच्या सहायक आयुक्तांनी परवानगी नाकारली आहे.अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ : गणेशोत्सव मंडळांना आॅनलाइन अर्जामुळे परवानगी तत्काळ मिळेल, असे वाटत होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे शेकडो अर्ज परवानगीच्या प्रतीक्षेत रखडले होते. त्यामुळे मंडळांना अर्जाची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढवून देण्यात आली होती. शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशीही पालिकेने आॅनलाइन अर्ज स्वीकारले. मात्र, अद्याप ४५२ अर्जांवरील प्रक्रिया सुरू आहे. ही मुदत २ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.मंडपासाठीएकूण अर्ज2,694परवानगीमिळालेली मंडळे1,425दुबार अर्ज594पुन्हा अर्ज करण्याची मुभा115