मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात ६ हजार २६९ कोरानाबाधितांची नोंद झाली. तर २२४ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी ७ हजार ३३२ रुग्णांनी कोविडवर मात केली, तर आतापर्यंत ६० लाख २९ हजार ८१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात ९३ हजार ४७९ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६२ लाख ५८ हजार ७९ इतकी आहे, तर मृतांचा आकडा १ लाख ३१ हजार ४२९ आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३५ टक्के आहे, तर मृत्युदर २.१ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६६ लाख ४४ हजार ४४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.४२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख २७ हजार ७५४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३ हजार ६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या २२४ मृतांमध्ये मुंबई ९, ठाणे २, कल्याण डोंबिवली मनपा २, उल्हासनगर मनपा ३, वसई विरार मनपा १२, रायगड ५३, पनवेल मनपा १, नाशिक २, नाशिक मनपा २, अहमदनगर ४, अहमदनगर मनपा १, जळगाव ३, जळगाव मनपा १, पुणे ५, पुणे मनपा ११, पिंपरी चिंचवड मनपा ३०, सोलापूर ६, सातारा १८, कोल्हापूर ६, सांगली १२, सांगली मिरज कुपवाड मनपा ४, सिंधुदुर्ग ६, रत्नागिरी ६, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ३, जालना १, उस्मानाबाद २, बीड ३, यवतमाळ ८, नागपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे.