२,२६,९०४ मुंबईकरांनी एका महिन्यात घेतले नवे मोबाइल सीमकार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 08:41 AM2021-08-27T08:41:18+5:302021-08-27T08:41:39+5:30
ट्रायची आकडेवारी; एमटीएनएलची घसरण कायम . एमटीएनएल वगळता इतर सर्व कंपन्यांच्या ग्राहकसंख्येचा आलेख वाढता आहे.
- सुहास शेलार,
लोकमत न्यूज नेटवर्क । मुंबई : एकीकडे इंटेरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढत असताना, जून महिन्यात तब्बल २ लाख २६ हजार ९०४ मुंबईकरांनी नवे सिमकार्ड घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई सर्कलमधील मोबाइल वापरकर्त्यांची संख्या ३ कोटी ७२ लाख ३७ हजार ७५२ वर पोहोचली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
खासगी कंपन्यांकडे कल
n एमटीएनएल वगळता इतर सर्व कंपन्यांच्या ग्राहकसंख्येचा आलेख वाढता आहे.
n जूनमध्ये एमटीएनएलने मुंबईतील ३ हजार ९५२ ग्राहक गमावले. सध्या त्यांच्याकडे ११ लाख २६ हजार ८३८ ग्राहक शिल्लक आहेत.
n १ सप्टेंबरपासून एमटीएनएलची सेवा बीएसएनएल हाताळणार असल्यामुळे उर्वरित ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
n दुसरीकडे जीओने या महिन्यात सर्वाधिक १ लाख १९ हजार २७० ग्राहक जोडले आहेत.
n मुंबईतील जीओ वापरकर्त्यांची संख्या १ कोटी ५३ लाख ४३ हजार ६३४ वर पोहोचली आहे.
कामगिरी अशी...
n जून महिन्यात ६१ हजार १४० मुंबईकरांनी एअरटेलची निवड केली. त्यामुळे त्यांची मुंबईतील
ग्राहकसंख्या ९६ लाख ९ हजार
५०१ इतकी नोंदविण्यात
आली.
n व्होडाफोननेही याकाळात ४९ हजार २९३ ग्राहक जोडले. त्यांची ग्राहकसंख्या १ कोटी ११ लाख ५५ हजार ८१७वर पोहोचली आहे.
n विशेष म्हणजे रिलायन्स कम्युनिकेशनच्या ग्राहकांतही जून महिन्यात वाढ दिसून आली. त्यांची ग्राहकसंख्या ८१४ वरून १ हजार ९६२ इतकी नोंदविण्यात आली.
राज्यातील स्थिती काय?
ट्रायच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात महाराष्ट्र सर्कलमध्ये ४ लाख ३२ हजार ८८१ जणांनी नवे सिमकार्ड खरेदी केले. त्यामुळे राज्यातील एकूण सीमकार्डधारकांची संख्या (मुंबई वगळून) ९ कोटी ४६ लाख २७ हजार ६९८ वर पोहोचली आहे.