- सुहास शेलार,
लोकमत न्यूज नेटवर्क । मुंबई : एकीकडे इंटेरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढत असताना, जून महिन्यात तब्बल २ लाख २६ हजार ९०४ मुंबईकरांनी नवे सिमकार्ड घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई सर्कलमधील मोबाइल वापरकर्त्यांची संख्या ३ कोटी ७२ लाख ३७ हजार ७५२ वर पोहोचली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
खासगी कंपन्यांकडे कलn एमटीएनएल वगळता इतर सर्व कंपन्यांच्या ग्राहकसंख्येचा आलेख वाढता आहे. n जूनमध्ये एमटीएनएलने मुंबईतील ३ हजार ९५२ ग्राहक गमावले. सध्या त्यांच्याकडे ११ लाख २६ हजार ८३८ ग्राहक शिल्लक आहेत. n १ सप्टेंबरपासून एमटीएनएलची सेवा बीएसएनएल हाताळणार असल्यामुळे उर्वरित ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. n दुसरीकडे जीओने या महिन्यात सर्वाधिक १ लाख १९ हजार २७० ग्राहक जोडले आहेत. n मुंबईतील जीओ वापरकर्त्यांची संख्या १ कोटी ५३ लाख ४३ हजार ६३४ वर पोहोचली आहे.
कामगिरी अशी...n जून महिन्यात ६१ हजार १४० मुंबईकरांनी एअरटेलची निवड केली. त्यामुळे त्यांची मुंबईतील ग्राहकसंख्या ९६ लाख ९ हजार ५०१ इतकी नोंदविण्यात आली. n व्होडाफोननेही याकाळात ४९ हजार २९३ ग्राहक जोडले. त्यांची ग्राहकसंख्या १ कोटी ११ लाख ५५ हजार ८१७वर पोहोचली आहे. n विशेष म्हणजे रिलायन्स कम्युनिकेशनच्या ग्राहकांतही जून महिन्यात वाढ दिसून आली. त्यांची ग्राहकसंख्या ८१४ वरून १ हजार ९६२ इतकी नोंदविण्यात आली.
राज्यातील स्थिती काय?ट्रायच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात महाराष्ट्र सर्कलमध्ये ४ लाख ३२ हजार ८८१ जणांनी नवे सिमकार्ड खरेदी केले. त्यामुळे राज्यातील एकूण सीमकार्डधारकांची संख्या (मुंबई वगळून) ९ कोटी ४६ लाख २७ हजार ६९८ वर पोहोचली आहे.