Join us

२३ अतिरिक्त जिल्हाधिकारी झाले आयएएस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 6:26 AM

राज्यातील २३ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आयएएस म्हणून पदोन्नती मिळाली आहे. केंद्राच्या कार्मिक विभागाने गुरुवारी याबाबतची अधिसूचना काढली. त्यांना लवकरच राज्य शासनाकडून नियुक्ती दिली जाईल.

मुंबई : राज्यातील २३ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आयएएस म्हणून पदोन्नती मिळाली आहे. केंद्राच्या कार्मिक विभागाने गुरुवारी याबाबतची अधिसूचना काढली. त्यांना लवकरच राज्य शासनाकडून नियुक्ती दिली जाईल.हे अधिकारी असे -यू.ए. जाधव, विजयकुमार फड, कान्हू बगाटे, भाऊसाहेब दांगडे, किशन जावळे, श्यामसुंदर पाटील, दिलीप स्वामी, संजय चव्हाण, सिद्धराम सालिमठ, रघुनाथ गावडे, किशोर तावडे, प्रमोद यादव, कविता द्विवेदी, सुधाकर तेलंग, मंगेश मोहिते, शिवानंद टाकसाळे, राजेंद्र क्षीरसागर, प्रवीण पुरी, विनय मून, प्रदीपकुमार डांगे, वर्षा ठाकूर, अनिल रामोद, चिंतामण जोशी. प्रदीपकुमार डांगे यांचे बंधू चंद्रकांत डांगे हे याआधीच आएएस आहेत. दोन सख्खे भाऊ आयएएस अधिकारी होण्याचे हे राज्यातील पहिलेच उदाहरण असावे.

टॅग्स :महाराष्ट्र सरकार