Join us

पूर्व उपनगरातील २३ पुलांची होणार दुरुस्ती

By जयंत होवाळ | Published: December 01, 2023 9:04 PM

पालिकेला १२ महिन्यांच्या अवधीत दुरुस्तीची कामे पूर्ण कारवी लागणार आहेत.

मुंबई : पश्चिम उपनरांप्रमाणे आता पूर्व उपनगरातील पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.चेंबूर, मानखुर्द, गोवंडी आणि कुर्ला भागातील हे पूल आहेत. एकूण २३ पुलांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मागील महिन्यात पालिकेने पश्चिम उपनगराच्या काही भागातील पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. त्यानंतर आता पूर्व उपनगर अजेंड्यावर आहे. दोन्ही उपनगरातील अनेक पूल मोडकळीस आले आहेत. काहींची दुरवस्था झाली आहे. काही पुलांच्या पायऱ्या-लाद्या उखडल्या आहेत. त्यामुळे त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे. या पुलांच्या दुरुस्तीसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. १० कंपन्या निविदा प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. कंत्राट मिळालेल्या कंपनीला अनामत रक्कम म्हणून सहा कोटी रुपये पालिकेकडे भरावे लागणार आहेत. १२ महिन्यांच्या अवधीत दुरुस्तीची कामे पूर्ण कारवी लागणार आहेत.

एम -पश्चिम विभागातील आठ पूल , एल विभागातील सहा पूल आणि एम-पूर्व भागातील नऊ पुलांच्या डागडुजीची कामे हाती घेतली जाणार आहेत.

एम -पश्चिम विभागातील पूल

वैभव नगर नाल्यावरील पूल, गोवंडीवाशी नका माहुल रोड

शिवाजी चौक दुलीप सिंग मार्ग म्हैसूर कॉलनीचेंबूर, एम पश्चिम सबवे

पेस्तोक सागर पूल घाटकोपरसह्याद्री नगर चेंबूर फ्री वे

भक्ती पार्क चेंबूर भुयारी मार्गचेंबूर आर.सी.मार्ग

एल विभागातील पूल

साकीनाका राहत दरबार हॉटेलजवळील पूल

बामणपाडा मिठी नदी पूलअधिक नगर मिठी नदी पूल

नेहरू नगर नाला, कुर्लाकुर्ला बंटर भवन

एससीएलआर पादचारी पूल

एम पूर्व विभागातील पूल

चेंबूर एड नालाव्ही.एन. पूरव

घाटला नगरसुभाषनगर

अंकुर सिनेमाकुमुद विद्या मंदिर

रफिक नगर नाला १ व २

टॅग्स :मुंबई