Join us

विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 6:07 AM

मुंबईतील १४ तर ठाणे-पालघर जिल्ह्यातील दहा उमेदवार जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली असून मुंबईतील १३ तर ठाणे-पालघरमधील दहा विद्यमान आमदारांवर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना उमेदवारी देतानाच त्यांचे मोठे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिम येथून उमेदवारी दिली आहे. कल्याण पूर्व मतदारसंघातील पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मध्यंतरी शिंदेसेनेच्या नेत्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. हे प्रकरण प्रचंड गाजले होते. गायकवाड यांच्याऐवजी त्यांची पत्नी सुलभा यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

नवी मुंबईत ऐरोलीतून आपल्याला तर बेलापूरमधून मुलाला उमेदवारी देण्याची आमदार गणेश नाईक यांनी केली होती. मात्र, ऐरोलीतून त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली असली तरी बेलापूरमध्ये भाजपने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला आहे. मुलगा संदीप नाईक यांना उमेदवारी न दिल्याने गणेश नाईक नाराज असल्याचे बोलले जात आहे. पनवेल आणि उरण येथून अनुक्रमे प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात विद्यमान आमदार संजय केळकर यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबईभाजपा