एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या पत्रावर २३ आमदारांच्या सह्या; अपात्रता सुनावणीत मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 05:17 PM2023-12-08T17:17:47+5:302023-12-08T17:20:58+5:30

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर २१ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीची ही अटेंडन्स शीट ठाकरे गटाकडून समोर आणण्यात आली आहे.

23 MLAs signatures on Eknath Shinde removal letter Big twist in shivsena disqualification hearing | एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या पत्रावर २३ आमदारांच्या सह्या; अपात्रता सुनावणीत मोठा ट्विस्ट

एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या पत्रावर २३ आमदारांच्या सह्या; अपात्रता सुनावणीत मोठा ट्विस्ट

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गेल्या काही दिवसांपासून सलग सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने हुकमी अस्त्र बाहेर काढल्याचं बघायला मिळालं. शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे यांची उलट तपासणी सुरू असताना ठाकरे गटाच्या वकिलांनी एक अटेंडन्स शीट सादर केली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर २१ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीची ही अटेंडन्स शीट असून या बैठकीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर शिवसेनेच्या आमदारांनी सह्या केल्या होत्या. यामध्ये सध्या शिंदे गटात असणाऱ्या आमदारांसहित २३ जणांच्या सह्या आहेत. त्यामुळे ही अटेंडन्स शीट शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, '२१ जून रोजी सुनील प्रभू यांनी शिवसेना आमदारांच्या बैठकीसाठी व्हिप जारी केला होता. या बैठकीला एकूण २३ आमदार उपस्थित होते. बैठकीत उद्धव ठाकरे यांना समर्थन देत एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्या प्रस्तावाला उपस्थित आमदारांनी अनुमोदनही दिलं. सदर आमदारांनी अटेंडन्स शीटवर सह्याही केल्या होत्या.'

कोणकोणत्या आमदारांचा समावेश?

वर्षावर झालेल्या बैठकीला आता शिंदे गटात असणारे आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर हे उपस्थित होते.

दरम्यान, या अटेंडन्स शीटवरून ठाकरे गटाचे वकील शिंदे गटातील आमदारांना उलटतपासणीच्या दरम्यान प्रश्नांचा भडीमार करत कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
 

Read in English

Web Title: 23 MLAs signatures on Eknath Shinde removal letter Big twist in shivsena disqualification hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.