मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 09:48 AM2019-07-03T09:48:02+5:302019-07-03T09:48:31+5:30

या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. अनेक जणांचे मृतदेह छिन्नविच्छिन अवस्थेत पाहण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे.

23 persons have lost their lives after a wall collapsed in Malad | मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू 

मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू 

Next

मुंबई - मालाड येथील पिंपरीपाडा येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळून दुर्घटना घडली होती. सोमवारी रात्री बेसावध असलेल्या लोकांवर काळाने झडप घातली. एनडीआरएफ, अग्निशामन दलाकडून करण्यात येत असलेल्या बचावकार्यात पावसामुळे अडथळा येत होते.  

या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. अनेक जणांचे मृतदेह छिन्नविच्छिन अवस्थेत पाहण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. दुदैवी घटनेत 70 पेक्षा अधिक जण जखमी झालेत. या जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जखमींना रुग्णालयात जाऊन भेट दिली. मृतांमध्ये लहान मुले, पुरुष, महिला यांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत देण्यात आली आहे तर महापालिकेकडूनही 5 लाखांची मदत करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. 


मुसळधार पाऊस आणि काळोख त्यातच उघड्यावर पडलेल्या विजेच्या तारा यामुळे अडकलेल्याची मदत करण्यात बरेच अडथळे निर्माण झाले होते. अग्नीशमन दल, डॉग स्कॉड आणि एनडीआरएफ पथकाच्या कामात बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेणारे नातेवाईक व माध्यम प्रतिनिधींचा अडथळा होत होता. ढिगारा उपसत असताना पाऊसाचा जोर वाढल्याने मातीखाली गाडले जाऊन मृतांचा आकडा वाढला. 

या दुर्घटनेत 12 वर्षांच्या दीपा ननावरेचा करुण अंत झाला. दीपानं तब्बल 12 तास मृत्यूशी झुंज दिली. ढिगाऱ्याच्या अडकलेली दीपा जीवाच्या आकांताने ‘मला इथून बाहेर काढा’ असे सातत्याने सांगत विव्हळत होती. सोमवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दीपाला जवळपास १२ तासांनी बाहेर काढण्यात यश आले. घटनास्थळी डॉक्टरांनी तिला त्वरित उपचार केले, मात्र तिला वाचवण्यात यश आले नाही, अखेर तिची मृत्यूशी झुंज संपुष्टात आली.

मी नुकताच कामावरून घरी परतलो होतो. तेव्हा आमच्या चाळीत धावपळ सुरू झाली. काही तरी गडबड आहे याचा अंदाज आला आणि मी न जेवताच घराबाहेर आलो. तेव्हा पिंपरीपाड्यात भिंत कोसळून अनेक लोक अडकल्याचे समजले. क्षणाचाही विलंब न लावता मी माझ्या अन्य मित्रांना धडाधड फोन केले आणि शक्य होईल तितक्या लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढत गाडीत बसवुन रुग्णालयात पाठवले. - मनीष कांबळे ( प्रत्यक्षदर्शी)
 

Web Title: 23 persons have lost their lives after a wall collapsed in Malad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.