खासगी कंपन्यांनी खोदले २३ रस्ते
By admin | Published: May 25, 2014 01:26 AM2014-05-25T01:26:24+5:302014-05-25T01:26:24+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ते आधीच खराब झालेले आहेत.
ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ते आधीच खराब झालेले आहेत. त्यांच्या दुरुस्तीकडे आधीच लक्ष दिले जात नसताना रिलायन्स इन्फोटेक कंपनीने जिल्ह्यातील सुमारे २३ रस्ते खोदून आॅप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरू केल. यामुळे या रस्त्यांवरून ये-जा करताना जिल्हा परिषदेच्या नाकर्तेपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या कंपनीने कोणतीही परवानगी न घेता अंबरनाथ, कल्याण, पालघर, भिवंडी आणि वाडा या तालुक्यातील सुमारे २३ ग्रामीण रस्ते खोदून त्यात बिनधास्त केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला याची पुसटशीदेखील कल्पना नसते. पण खोदलेल्या या रस्त्यांवरून ये-जा करणार्या ग्रामस्थांचा संताप बहुतांशी जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेच्या सभागृहात व्यक्त केला. २३ रस्त्यांचे सुमारे ३८ किमी लांबीचे रस्ते खराब होऊ घातले आहेत. सुमारे जिल्हा परिषद सदस्यांनी ही बाब उघड केली नसती तर सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्यांची बेवारसपणे खोदाई करून कंपनीने केबल टाकण्याचे काम पूर्ण केले असते. पण जिल्हा परिषद सदस्या ज्योती ठाकरे यांच्या जागरूकपणामुळे जिल्ह्यातील बेदखल खोदाईची बाब उघड झाली. त्यासंदर्भात संबंधित कंपनीशी करार करण्यासाठी आता बांधकाम विभाग पुढे आला आहे. कंपनीला परवानगी मिळणार नसल्याचे बांधकाम विभागातून सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)