अकरावीत घेतले २३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:36 AM2017-07-25T00:36:29+5:302017-07-25T00:36:29+5:30
अकरावीच्या दुसऱ्या यादीत तब्बल ८० हजार १४१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. त्यापैकी फक्त २३ हजार ४३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला
लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : सध्या जागतिक पातळीवर ई-कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ई-कचरा ठेवायला जागा मिळत नाही. या वस्तू दररोजच्या कचऱ्यात सापडतात. ओल्या कचऱ्यात अशा वस्तू मिसळल्यामुळे त्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो. शहरासह ग्रामीण भागासाठी हा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत समाजात जागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर हसिना फरास यांनी केले.
पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात सोमवारी दुपारी रोटरी क्लब आॅफ करवीर, दि रोटरी करवीर चॅरिटेबल ट्रस्ट, न्यू एज्युकेशन सोसायटी, शिक्षण उपसंचालक विभाग, कोल्हापूर, महाराष्ट्र प्रदर्शन नियंत्रण महामंडळ, कोल्हापूर विभाग व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘इलेक्ट्रॉनिक कचरा जागृती अभियान’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पी.डी.जी. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डॉ. वासुदेव देशिंगकर होते.
डॉ. देशिंगकर म्हणाले, पर्यावरण संबंधित या समस्येबाबत ‘रोटरी’च्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. ई-कचऱ्याचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतोच पण पर्यावरण संतुलन बिघडत आहे. याबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त प्रमाणात ई-कचरा संकलित करणे हा उद्देश आहे.
ई-कचरा व प्लास्टिक जागृती अभियान अध्यक्ष एस. एन. पाटील म्हणाले, शहरातील महानगरपालिका शाळांतील तसेच खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी घरामधील अडगळीतील, परिसरातील ई-कचरा आणून तो शाळेत जमा करायचा आहे. हा ई-कचरा ‘रोटरी’च्यावतीने संकलित करून त्याचा योग्य पुनर्वापर करण्यासाठी देण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी २९ जुलैपर्यंत घरातील ई-कचरा शाळेत जमा करावा. यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे पी. एस. हेरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले, तर ई-कचरा व प्लास्टिक जागृती अभियानाचे सचिव प्रमोद चौगले यांनी उपक्रमाबाबत प्रेझेंटेशन देऊन आभार मानले. कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्टचे हृषीकेश केसकर, रोटरी क्लब आॅफ करवीरचे अध्यक्ष विशाल जांभळे, ‘रोटरी’चे पदाधिकारी उपस्थित होते.