मोनो रेल्वेच्या खर्चात २३६ कोटींची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:58 AM2018-05-18T05:58:19+5:302018-05-18T12:25:07+5:30
देशात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या मात्र, नोव्हेंबर २०१७ मध्ये मैसूर कॉलनी स्थानकाजवळ लागलेल्या आगीनंतर बंद पडलेल्या मोेनो रेल्वेच्या खर्चात २३६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे
मुंबई : देशात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या मात्र, नोव्हेंबर २०१७ मध्ये मैसूर कॉलनी स्थानकाजवळ लागलेल्या आगीनंतर बंद पडलेल्या मोेनो रेल्वेच्या खर्चात २३६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईतील मोनो रेल्वेच्या टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ यासाठी अपेक्षित असणारा खर्च २४६० कोटी रुपये इतका आहे. आता या खर्चात २३६ कोटी रुपयांची वाढ होणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारात एमएमआरडीए प्राधिकरणाकडून ही माहिती मिळाली आहे. त्यामुळेच आधीच विलंबाने सुरू होणारा मोनोरेल्वे प्रकल्प हा मुंबईकरांच्या दृष्टीने महागडादेखील आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ३१ जानेवारी २०१८ रोजी एमएमआरडीए प्रशासनाकडे मोनो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यासाठी अपेक्षित असलेला खर्च आणि वाढीव खर्चाची माहिती मागितली होती. एमएमआरडीए प्रशासनाचे जनमाहिती अधिकारी तरुवर बॅनर्जी यांनी अनिल गलगली यांना कळविले की, मोनोरेल्वे टप्पा १ आणि मोनोरेल्वे टप्पा २ यासाठी २,४६० कोटी (कर वगळता) रुपये एवढा अपेक्षित खर्च आहे. सद्य:स्थितीत २,१३६ एवढा खर्च करण्यात आला आहे. मोनोरेल्वे टप्पा १, टप्पा २ साठी एकूण अपेक्षित वाढीव खर्च २३६ कोटी रुपये इतका आहे.
मोनोरेल्वे टप्पा १ आणि मोनोरेल्वे टप्पा २ या प्रकल्पाच्या वाढीव २३६ कोटींच्या खर्चास एमएमआरडीए प्राधिकरण समिती, कार्यकारी समिती आणि महानगरपालिका आयुक्त यांची मान्यता आहे तसेच शासनाची मान्यता मिळाली आहे.
दरम्यान, मोनोरेल्वे प्रकल्प चुकीच्या पद्धतीने कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे एमएमआरडीए प्रशासनाला तोटाच तोटा सहन करावा लागला आहे. यात गुंतलेल्या सर्वांची चौकशी करत कार्यवाही करणे आवश्यक असून वाढीव खर्च दोषी असलेल्या व्यक्तींकडून वसूल केला पाहिजे, असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.
>पहिला टप्पा
मोनो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याची एकूण लांबी
8.80 ङटचेंबूर ते वडाळा डेपो या पहिल्या टप्प्यात
>7 स्टेशन्स
चेंबूर व्ही.एन. पुरव मार्ग आर.सी. मार्ग जंक्शन फर्टलायजर टाऊनशिप भारत पेट्रोलियम मैसूर कॉलनी भक्ती पार्क वडाळा चेंबूर व्ही.एन. पुरव मार्ग आर.सी. मार्ग जंक्शन फर्टलायजर टाऊनशिप भारत पेट्रोलियम मैसूर कॉलनी भक्ती पार्क वडाळा डेपो
>दुसरा टप्पा
मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याची एकूण लांबी संत गाडगे महाराज चौक ते वडाळा डेपो या दुसºया टप्प्यात
>10 स्टेशन्स
संत गाडगे महाराज चौक लोअर परळ मिंट कॉलनी आंबडेकर नगर नायगाव दादर पूर्व वडाळा ब्रिज आचार्य अत्रे नगर अॅण्टॉप हिल जीटीबी नगर मोनो रेल्वे टप्पा १, मोनो रेल्वे टप्पा २ या प्रकल्पाच्या वाढीव
236 कोटींच्या खर्चास एमएमआरडीए प्राधिकरण समिती, कार्यकारी समिती आणि महानगरपालिका आयुक्त यांची तसेच शासनाची मान्यता