राज्यात दिवसभरात २३६ मृत्यू, तर ९,८३० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:19+5:302021-06-18T04:06:19+5:30
मुंबई : राज्यात गुरुवारी ९,८३० नवे कोरोना रुग्ण, तर २३६ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५९ ...
मुंबई : राज्यात गुरुवारी ९,८३० नवे कोरोना रुग्ण, तर २३६ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५९ लाख ४४ हजार ७१० झाली असून, मृतांचा आकडा एक लाख १६ हजार २६ झाला आहे. सध्या एक लाख ३९ हजार ९६० रुग्ण उपचाराधीन आहेत.
राज्यात दिवसभरात ५,८९० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ५६ लाख ८५ हजार ६३६ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६४ टक्के आहे. आजपर्यंत तपासलेल्या तीन कोटी ८८ लाख ५७ हजार ६४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आहेत. राज्यात आठ लाख ५० हजार ६६३ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत, तर चार लाख ९६४ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत. राज्यात पुण्यात १८ हजार ८८७, मुंबईत १८ हजार ४१७, कोल्हापूर १३ हजार ४८५, ठाणे १४ हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.