Join us

शहर भागात बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद, जलवाहिनीचे काम हाती घेतल्याने नागरिकांना आवाहन

By सीमा महांगडे | Published: January 15, 2024 9:12 PM

या दरम्यान ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे.

मुंबईमहानगरपालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा व्यवस्थित करण्याकरिता नवानगर, डॉकयार्ड रोड येथे असलेली जुनी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी बंद करुन सदर ठिकाणी नवीन १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱया जुन्या १२०० मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम बुधवार, १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून ते गुरुवार, १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. 

या दरम्यान ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. शिवाय जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या काळात पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा आणि १७ व १८ जानेवारी २०२४ पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. 

ए विभाग-नेव्हल डॉकयार्ड सप्लाय - सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमापर्यंत - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १.३० ते सायंकाळी ४.१५ आणि रात्री ९.३० ते मध्यरात्री १.००) - १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

ई विभागनेसबीट  झोन (१२०० मि.मी. आणि ८०० मि.मी.) - ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते सकाळी ६.३०) -  १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद. म्हातारपाखाडी रोड झोन - म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी रोड, नेसबीट रोड, ताडवाडी  रेल्वे कुंपण (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६.३० ते सकाळी ८.१५) -  १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.डॉकयार्ड  रोड  झोन - बॅ. नाथ पै मार्ग, डिलिमा स्ट्रीट, गनपावडर रोड, कासार गल्ली, लोहारखाता, कॉपरस्मिथ मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२.२० ते दुपारी २.५०) - १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.हातीबाग   मार्ग - हातीबाग, शेठ मोतिशहा लेन, डि. एन. सिंघ  मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ३.२० ते सायंकाळी ५.००) - १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.जे. जे. रुग्णालय – (२४ तास पाणीपुरवठा) – कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन - मुंबई पोर्ट ट्रस्ट, दारुखाना - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.४५ ते सायंकाळी ५.५५) - १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.रे रोड  झोन - बॅ. नाथ पै मार्ग, मोदी कुंपण, ऍटलास मिल कुंपण, घोडपदेव छेद गल्ली क्रमांक १-३ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.०० ते रात्री ८.१५) -  १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.माऊंट मार्ग - रामभाऊ भोगले मार्ग, फेर बंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान,  घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, भायखळा  (पूर्व), शेठ मोतिशहा लेन, टी. बी. कदम मार्ग, संत सावता मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.००) -  १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

३) बी विभाग–बाबूला  टँक  झोन - मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली  मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.१०) – १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.डोंगरी   बी – झोन - नूरबाग, डोंगरी, रामचंद्र भट मार्ग, सॅम्युअल रस्ता, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा रस्ता - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.१०) - १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.*डोंगरी ‘ए’  झोन - उमरखाडी, वालपाखाडी, रामचंद्र भट मार्ग, समाताभाई नानजी मार्ग, शायदा मार्ग, नूरबाग आणि डॉ . महेश्वरी मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.३० ते रात्री १०.००) -१७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन - सर्व मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, पी. डिमेलो मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.३० आणि रात्री ११.३० ते मध्यरात्री २.००) -  १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.मध्म रेल्वे – रेल्वे यार्ड (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.०० ते रात्री ८.००) -  १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.वाडी  बंदर - पी. डिमेलो रोड, नंदलाल जैन मार्ग, लीलाधर शाह मार्ग, दानाबंदर, संत तुकाराम मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.२० ते सायंकाळी ५.३०) - १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.वाडी  बंदर - पी. डिमेलो मार्ग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.००) - १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.आझाद  मैदान बुस्टींग - (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.४० ते सकाळी ६.००) -  १७ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

 

टॅग्स :मुंबईपाणीकपात