२४ तासांत ९८० विमानांची ये-जा, मुंबई विमानतळाने मोडला स्वत:चा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 04:52 AM2018-02-05T04:52:14+5:302018-02-05T04:52:27+5:30
सर्वाधिक वर्दळ असलेला रनवे आहे मुंबई विमानतळाचा. तरीही २० जानेवारी रोजी २४ तासांत ९८० विमानांची ये-जा पूर्ण करून, या मुंबई विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला.
मुंबई : सर्वाधिक वर्दळ असलेला रनवे आहे मुंबई विमानतळाचा. तरीही २० जानेवारी रोजी २४ तासांत ९८० विमानांची ये-जा पूर्ण करून, या मुंबई विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. यापूर्वी ६ डिसेंबर रोजी याच विमानतळावर २४ तासांमध्ये ९७४ विमानांची ये-जा झाली होती.
लंडनमधील गॅटविक विमानतळाची दर तासाला ५५ एअर ट्रॅफिक कंट्रोल करण्याची क्षमता आहे, तर मुंबईचीे क्षमता ५२ आहे. मुंबई विमानतळावर खूपच कमी वेळा एक तासात ५२ विमानांचे नियंत्रण केले गेले आहे. गॅटविक सिंगल रनवेची उन्हाळ्याच्या दिवसात रोज विमानांच्या ये-जा करण्याची क्षमता ८७० आहे. गॅटविक विमानतळावर पहाटे ५ वाजेपासून ते अर्ध्या रात्रीपर्यंत १९ तास विमाने येत असतात. मात्र, मुंबई विमानतळावर २४ तास विमाने येत असतात.
मुंबईत सकाळी ६ ते १० आणि दुपारी १.५० ते ३ व रात्री ७.५०नंतर मोठ्या प्रमाणात विमाने येतात. सरासरी ४८ विमानांची ये-जा होते. मुंबईत जागेची कमतरता आहे. तर, लंडनमध्ये चार मोठी विमानतळे आहेत. हीथ्रो, गॅटविक एअरपोर्ट, स्टॅन्स्टेड एअरपोर्ट व ल्यूटन एअरपोर्ट इंग्लंडमध्येच आहेत. हीथ्रोमध्ये एकाच वेळी उपयोगात येणारे अनेक रनवे आहेत. मुंबईत फक्त एकच रनवे आहे.
>असंख्य अडचणी, तरीही...
एअरपोर्ट ट्रॅफिक कंट्रोल करणा-या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, मुंबईत येणा-या विमानतळांसाठी एक मुख्य रनवे आहे. एक छोटा रनवेही आहे. मात्र, या रनवेवर एका तासात फक्त एक किंवा दोन विमाने नियंत्रित करता येतात.
>अधिका-याने सांगितले की, जर काही आपत्कालीन परिस्थिती आली आणि मुख्य रनवे बंद करावा लागला तर, मुंबई एअरपोर्टमध्ये विमानांचे लँडिंग आणि एकूणच ये-जा जवळपास बंद होते.मात्र मुंबईहून विमानांची उड्डाणे नेहमीच विलंबाने होतात आणि येणा-या विमानांना अनेक मिनिटे आकाशात घिरट्या घालाव्या लागतात. त्यामुळे प्रवाशांना आपल्या कामालाही उशीर होतो.