२४ तासांत दोघींना मारहाण करून लुटले

By admin | Published: April 4, 2016 03:10 AM2016-04-04T03:10:34+5:302016-04-04T03:10:34+5:30

वाकोल्यात २४ तासांत एका तरुणीसह विवाहितेला मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

In 24 hours, both were robbed and robbed | २४ तासांत दोघींना मारहाण करून लुटले

२४ तासांत दोघींना मारहाण करून लुटले

Next

मुंबई : वाकोल्यात २४ तासांत एका तरुणीसह विवाहितेला मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मस्जिद बंदर येथे राहणारी सायली कोळे (२१) शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कलिना येथून कुर्ला स्टेशनला जाणाऱ्या बसमध्ये चढली. त्याच वेळी पाठीमागून चढलेल्या अनोळखी तरुणाने तिच्या खिशातील मोबाइल काढण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला प्रतिकार केला असता, त्याने तिला धक्का देऊन मोबाइलसह पळ काढला. त्यामुळे सायली चालत्या बसमधून खाली पडली. या अपघातात ती जखमी झाली असून, तिला तत्काळ जवळच्या व्ही.एन.देसाई रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी सायलीचा जबाब नोंदविला. या प्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे, तसेच प्रत्यक्षदर्शी आणि सायलीने केलेल्या वर्णनावरून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मरियम सय्यद (३०) या ३० वर्षीय विवाहितेवर ब्लेडने हल्ला करत, तिची बॅग हिसकावल्याची घटना समोर आली. सांताक्रुझ येथील रहिवासी असलेल्या सय्यद या सांताक्रुझ पश्चिमेकडील नेहरू रोड येथून पायी जात असताना, ही घटना घडली. यामध्ये त्यांच्या बॅगमधील पैसे आणि मोबाइल चोरीला गेला आहे. त्यांनाही स्थानिकांच्या मदतीने जवळच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. दोघींचीही प्रकृती स्थिर असून, या प्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करत आहेत. २४ तासांत दिवसाढवळ्या घडलेल्या या दोन्हीही घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In 24 hours, both were robbed and robbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.