प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत राज्यात २४ लाख लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:14 AM2021-09-02T04:14:17+5:302021-09-02T04:14:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई, - माता व बाल मृत्युदर कमी करण्याबरोबरच माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने ...

24 lakh beneficiaries in the state under Pradhan Mantri Matruvandana Yojana | प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत राज्यात २४ लाख लाभार्थी

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत राज्यात २४ लाख लाभार्थी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई, - माता व बाल मृत्युदर कमी करण्याबरोबरच माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात सुमारे २३ लाख ९२ हजार लाभार्थींची नोंदणी केली आहे. १ हजार कोटींपेक्षा जास्त निधीचे वितरण करण्यात आले आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने कळविले आहे.

या योजनेंतर्गत राज्यात सुमारे २३ लाख ९२ हजार ५५२ लाभार्थींची नोंदणी झाली आहे. उद्दिष्टाचे प्रमाण ९२ टक्के असून, सर्वाधिक १०१ टक्के लाभार्थींची नोंदणी पुणे जिल्ह्यात २ लाख ८ हजार १६६ लाभार्थींची नोंद झाली आहे. राज्यातील सर्व नोंदणी झालेल्या लाभार्थींसाठी सुमारे १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वितरित करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत शासनाने अधिसूचना केलेल्या संस्थेत अथवा शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस पहिल्या जीवित अपत्यापर्यंत लाभ दिला जात असून, ५ हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येते. वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. पात्र गर्भवती महिलेस ३ टप्प्यात डीबीटीद्वारे संबंधित गर्भवती लाभार्थी महिलेच्या थेट संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यामध्ये लाभाची रक्कम थेट जमा केली जाते.

मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर एक हजार रुपये दिले जातात. किमान एकदा प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या ६ महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा दोन हजार रुपयांचा हप्ता लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो, तर प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटायटिस व तसेच पेन्टाव्हॅलेन्टच्या ३ मात्रा अथवा समतुल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो.

-------------------

विशेष सप्ताह सुरू

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने १ ते ७ सप्टेंबरदरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन केले आहे. या कालावधीत पात्र लाभार्थींनी आपल्या कार्यक्षेत्रातील आशा स्वयंसेविका/एएनएम/अंगणवाडी सेविका यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे.

Web Title: 24 lakh beneficiaries in the state under Pradhan Mantri Matruvandana Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.