वाढत्या असहिष्णूतेविरोधात २४ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची 'पुरस्कार वापसी'

By admin | Published: November 5, 2015 04:42 PM2015-11-05T16:42:32+5:302015-11-05T16:44:04+5:30

देशातील असहिष्णूतेच्या वातावरणाच्या निषेधार्थ २४ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांनी पुरस्कार परत केले असून त्यात ख्यातनाम लेखिका अरुंधती रॉय, निर्माते कुंदन शहा तसेच सईद मिर्झा यांचा समावेश आहे.

24 national award winners 'award return' against rising intolerance | वाढत्या असहिष्णूतेविरोधात २४ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची 'पुरस्कार वापसी'

वाढत्या असहिष्णूतेविरोधात २४ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची 'पुरस्कार वापसी'

Next
>ऑनलाइन लोकम
मुंबई, दि. ५ - देशातील असहिष्णूतेच्या वातावरणाच्या निषेधार्थ २४ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांनी पुरस्कार परत केले असून त्यात ख्यातनाम लेखिका अरुंधती रॉय, निर्माते कुंदन शहा तसेच सईद मिर्झा यांचा समावेश आहे. 
बुकर पुरस्कार विजेत्या अरूंधती यांनी आज सकाळीच पुरस्कार परत असल्याची घोषणा केली होती. देशात विचारवंतांची होणारी हत्या, अल्पसंख्यांकावर होणारे हल्ले आणि बीफच्या बंदी या सर्व घटनांच्या निषेधार्थ रॉय यांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज दुपारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी इतर विजेत्यांसह पुरस्कार परत केले.
 
पुरस्कार परत करणा-यांची नावे खालील प्रमाणे : 
विरेंद्र सैनी, सईद मिर्झा, कुंदन शहा, अरूंधती रॉय,  रंजन पलीत, तपन बोस, श्रीप्रकाश, संजय काक, प्रदीप कृष्णन, तरूण भारतीय, अमिताभ चक्रवर्ती, मधूश्री दत्ता, अन्वर जमाल, अजय रैना, इरेन धार मलिक, पी.एम.सतीश, सत्य राय नागपाल, मनोज लोबो, रफिक एलीस, सुधीर पालसने, विवेक सच्चिदानंद, सुधाकर रेड्डी याकंती, मनोज निठरवल आणि अभिमन्यू डांगे. 
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांमुळे निषेधाचे सूर भक्कम होत असताना लेखक, कलाकार, चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक, वैज्ञानिक आणि इतिहासकारांनीही रालोआ सरकारविरुद्ध आवाज बुलंद करीत पुरस्कार परत केले आहेत. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरेंची हत्या, दादरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ अनेकांनी पुरस्कार वापसी केली. 

Web Title: 24 national award winners 'award return' against rising intolerance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.