राज्यात दिवसभरात २४ हजार १३६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:06 AM2021-05-26T04:06:43+5:302021-05-26T04:06:43+5:30
मुंबई : राज्यात मंगळवारी २४ हजार १३६ रुग्ण आणि ६०१ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर दुसरीकडे रुग्ण निदानाच्या तुलनेत ...
मुंबई : राज्यात मंगळवारी २४ हजार १३६ रुग्ण आणि ६०१ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर दुसरीकडे रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दिवसभरात ३६ हजार १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५२ लाख १८ हजार ७६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. सध्या तीन लाख १४ हजार ३६८ रुग्ण उपचाराधीन आहेत.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ टक्के असून, मृत्युदर १.६१ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या तीन कोटी ३५ लाख ४१ हजार ५६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.७७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २६ लाख १६ हजार ४२८ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत, तर २० हजार ८२९ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ६०१ मृत्यूंपैकी ३८९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर २१२ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या ६०१ मृत्यूंमध्ये मुंबई ३७, ठाणे ११, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा ४, पालघर ५, वसई विरार मनपा ५, रायगड २८, पनवेल मनपा २, नाशिक १३, नाशिक मनपा १०, मालेगाव मनपा १, अहमदनगर २१, अहमदनगर मनपा ४, जळगाव ६, नंदुरबार २, पुणे १०६, पुणे मनपा २५, सोलापूर ४२, सोलापूर मनपा १४, सातारा १७, कोल्हापूर २६, कोल्हापूर मनपा ४, सांगली २०, सांगली मिरज कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग १६, रत्नागिरी २१, औरंगाबाद ८, औरंगाबाद मनपा ३, जालना ६, परभणी २, परभणी मनपा १, लातूर ११, लातूर मनपा १, उस्मानाबाद १३, बीड १४, नांदेड ५, नांदेड मनपा ३, अकोला ६, अकोला मनपा ३, अमरावती १२, अमरावती मनपा २, यवतमाळ ५, वाशिम ९, नागपूर ८, नागपूर मनपा १०, वर्धा ६, भंडारा ५, गोंदिया ६, चंद्रपूर ९, चंद्रपूर मनपा ३ इ. रुग्णांचा समावेश आहे.
सक्रिय रुग्ण संख्येचा आलेख उतरता
तारीख सक्रिय रुग्णसंख्या
२५ मे ३,१४,३६८
२४ मे ३,२७,५८०
२३ मे ३,४८,३९५
२२ मे ३,२७,३६१
२१ मे ३,६७,१२१
२० मे ३,८३,२५३
राज्य
आजचा मृत्यूदर १.६१
आजचे मृत्यू ६०१
आजचे रुग्ण २४,१३६
सक्रिय रुग्ण ३,१४,३६८
मुंबई
आजचा मृत्यूदर ३.५
आजचे मृत्यू ३७
आजचे रुग्ण १०२९
सक्रिय रुग्ण २७८५५