मुंबई : मातोश्री जियाबेन चॅरिटेबल ट्रस्ट आणि ब्राइट आउटडोअर मीडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे बोरीवली येथे एक सप्त तारांकित रुग्णालय उभारण्यात येत असून, वर्षाला येथे २४ हजार डायलिसिस मोफत केले जातील. देशासह राज्यातील रुग्णांना याचा लाभ घेता येईल. विशेषत: जे गरीब आहेत, उपचारासाठी ज्यांच्याकडे पैसा नाही अशा रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे.ब्राइट आउटडोअर मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक योगेश लखानी यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, नव्या वर्षात आम्ही असंख्य उपक्रम हाती घेतले आहेत. या अंतर्गत बोरीवलीमधील सेंटरमध्ये वर्षाला २४ हजार डायलिसिस मोफत केले जातील. यासोबतच मातोश्री जियाबेन चॅरिटेबल ट्रस्ट आणि ब्राइट आउटडोअर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही महिन्याच्या पहिल्या रविवारी चारशे लोकांना महिन्याचे रेशन भरून देतो. दहा महिन्यांपासून हे काम सुरू आहे. कांदिवली आणि बोरीवली येथील दोनशे वृद्धांना आम्ही दररोज मोफत जेवण देतो. २५० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतो. शैक्षणिक साहित्य देतो.फोर्ट ते वडाळा येथील फ्री वेच्या परिसरात होर्डिंग्ज लावणार आहोत. या एका वृत्तवाहिनीचे होर्डिंग्ज माझ्या ‘हेडसेल’ कंपनीद्वारे लावले जात आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशसह संपूर्ण भारतात होर्डिंग्ज लावण्याचे काम मला मिळाले आहे. भारतात सर्वसाधारण होर्डिंग्ज लावले जातील.भारताबाहेर डिजिटल होर्डिंग्ज लावले जातील. २००९ सालच्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेचे कॅम्पेन केले होते. २०१३ सालच्या निवडणुकीत भाजपा, काँग्रेसचे कॅम्पेन केले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन करत आहे. ग्राहकांना चांगली सेवा-सुविधा देत आहे. याचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहेत.>गृहप्रवेश : मी आतापर्यंत पाच हजार वेळा नेत्रदीपक अशा सोहळ्याला हजेरी लावली आहे. मला दोन हजारांहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. रणवीर सिंग याच्या विवाह सोहळ्याला मी हजेरी लावली होती. दीपिका पदुकोणसोबत तेव्हा झालेली भेट अविस्मरणीय ठरली. २४ जानेवारीला माझा मुलगा अनुग्रह याचा वाढदिवस आहे. या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अंधेरी येथे नव्या घराचा गृहप्रवेशदेखील असून, याकामी पत्नी जागृती हिने मला मोलाची साथ दिली आहे.>मराठीसाठीही कार्यरतमहाविद्यालयीन महोत्सवांना मोफत होर्डिंग्ज देत आहोत. सामाजिक कार्यक्रमांना मोफत होर्डिंग्ज देत आहोत. ‘सिंबा’ चित्रपटाच्या होर्डिंग्जचे काम आम्ही केले होते.नव्या वर्षांत आम्ही शंभरएक चित्रपट करत आहोत. केवळ बॉलीवूड नाही तर मराठी, गुजरातीसह उर्वरित भाषिक चित्रपटांसाठी आम्ही काम करत आहोत.
मातोश्री जियाबेन चॅरिटेबल ट्रस्टच्या सेंटरमध्ये वर्षाला २४ हजार डायलिसिस मोफत होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 12:42 AM