मुंबई : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २४१ गुन्हे दाखल केले आहेत. टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य प्रकारे हे राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले आहेत.
त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र आहेत. यामध्ये बीड २७, पुणे ग्रामीण १९, मुंबई १७, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली १०, नाशिक ग्रामीण १०, जालना ९, सातारा८, नाशिक शहर ८, नांदेड ७, परभणी ७, ठाणे शहर ६, सिंधुदुर्ग ६, नागपूर शहर ५, नवी मुंबई ५,सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलढाणा ५, पुणे शहर ४, गोंदिया ४, ठाणे ग्रामीण ४, सोलापूर शहर ३, रायगड २, हिंगोली २, वाशिम १,धुळे १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
गुन्ह्यांचे विश्लेषण केले असता असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ११० तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ८१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. titktok विडिओ शेअर प्रकरणी ४ गुन्हे तर ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्या प्रकरणी ४१ गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत ४७ आरोपींना अटक केली आहे . ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स केल्या आहेत.
ऑनलाइन फसवणुकीपासून सावध रहा सध्या लॉकडाउनच्या काळात बरेच व्हाटसअँप मेसेजेस फिरत आहेत .या मेसेजेस मध्ये लोकांना एकतर मोबाईल रिचार्ज ऑनलाईन करण्यासाठी,किंवा कोणत्याही वेबसेरीजचे स्वस्तात आहे ,खालील लिंकवर क्लिक करा असा मजकूर असतो व एक लिंक दिली असते . आपण कोणीही अशा लिंक्सवर क्लिक करू नये .कारण सदर लिंक्स व मेसेजेस हे सायबर गुन्हेगारांची लोकांना फसविण्याची नवीन युक्ती आहे.
तुम्ही जर त्या लिंकवर क्लीक केले तर एक फॉर्म उघडतो ज्यात तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट्सचे सर्व डिटेल्स,पासवर्डस ,डेबिट/क्रेडिट कार्ड्सची माहिती ,पिन क्रमांक सर्व विचारले जाते . तुम्ही ही सर्व माहिती दिली कि, एक OTP येतो व तो जाणून घेण्यासाठी एक फोन येतो. काही वेळाने तुम्हाला तुमच्या बँकेचा sms येतो कि तुमच्या खात्यातून काही रक्कम अनोळखी खात्यात वळविली गेली आहे.त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या मोहात फसू नये .तसेच जर आपण चुकून फसविले गेले असाल तर त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी व www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर पण नोंद करावी . असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.