हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 244 कोटी, केंद्राचा निधी अपुरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 02:01 AM2020-11-05T02:01:44+5:302020-11-05T06:49:18+5:30
Mumbai Weather : वातावरण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भगवान केशभट यांच्या म्हणण्यानुसार, केंद्राने २०२१साठी सर्व शहरांना हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यातील बहुसंख्य शहरांमधील हवेची गुणवत्ता वायुप्रदूषणामुळे ढासळत आहे. ती सुधारण्यासाठीच्या मुंबईतील कार्यक्रमांना केंद्राने केवळ २४४ कोटी रुपयांची मदत केली. ही मदत तोकडी असून, मुंबईसारख्या मोठ्या शहराला मोठ्या मदतीची अपेक्षा असून आता प्राप्त झालेला निधी क्षमता वृद्धिंगत करण्यासह प्रशिक्षणासाठी वापरावा। असे म्हणणे पर्यावरणवाद्यांनी मांडले.
वातावरण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भगवान केशभट यांच्या म्हणण्यानुसार, केंद्राने २०२१साठी सर्व शहरांना हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. दोन टप्प्यांत ताे वितरित केला जाईल. पहिल्या टप्प्यात २ हजार २०० कोटी सर्व शहरांना देण्यात येत आहेत. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित रक्कम मिळेल. हा निधी प्रशिक्षण आणि आपली क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी
वापरला जावा.
एक तृतियांश प्रदूषण शहरी सीमांबाहेरील घटकांमुळे
- केंद्राच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (एनसीएपी) मध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांसह देशातील एकूण १०२ शहरांचा समावेश आहे.
- २०२४ पर्यंत प्रदूषक कणांची हवेतील घनता २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्यासाठी आराखडे मांडले जात आहेत. मुंबईतील वायुप्रदूषणातील सुमारे एक तृतियांश प्रदूषण शहरी सीमांबाहेरील घटकांमुळे होत आहे.
कोणाला किती ?(रुपये कोटीत)
आंध्र प्रदेश ६७.५
बिहार १०२
छत्तीसगड ५३.५
गुजरात २०२.२
हरयाणा २४
झारखंड ७९.५
कर्नाटक १३९.५
मध्य प्रदेश १४९.५
महाराष्ट्र ३९६.५
पंजाब ४५
राजस्थान १४०.५
तामिळनाडू ११६.५
तेलंगणा ११७
उत्तर प्रदेश ३५७
पश्चिम बंगाल २०९.५