७५० जागांसाठी २,४७५ विद्यार्थ्यांची कसोटी
By admin | Published: July 10, 2016 12:54 AM2016-07-10T00:54:38+5:302016-07-10T00:54:38+5:30
कला सीईटीमुळे लांबलेल्या कला अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या अभ्यासक्रमांच्या उपलब्ध जागेसाठी तिपटीहून अधिक अर्ज दाखल झाल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची
मुंबई : कला सीईटीमुळे लांबलेल्या कला अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या अभ्यासक्रमांच्या उपलब्ध जागेसाठी तिपटीहून अधिक अर्ज दाखल झाल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. फॅशन डिझायनिंग, फोटोग्रॉफी आणि फाइन आर्ट या कला अभ्यासक्रमांच्या प्रवेशापूर्वीच सीईटी निकालामुळे गोंधळ झाला होता. अनेक विद्यार्थी सीईटी परीक्षा अनुत्तीर्ण झाले होते. पूर्नमूल्यांकनानंतर निकालात बदल झाला आणि गुणवत्ता यादीही बदलली. मात्र, ७५० जागांसाठी २ हजार ४७५ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल्याने प्रवेशासाठी चुरस रंगणार आहे.
मुंबईतील जे. जे. स्कूल आॅफ आर्ट, रचना कॉलेज, विवा कॉलेज अशी राज्यभरात अप्लाइड आर्ट, फॅशन डिझायनिंग आणि स्कल्पचर या अभ्यासक्रमांकरीता चार शासकीय आणि पाच खासगी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी कला सीईटी घेण्यात आली. या परीक्षेत २ हजार ४७० विद्यार्थ्यांपैकी २ हजार १९८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. परिणामी, पुर्नमूल्यांकन करण्यात आले. त्यात ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचे गुण वाढले आणि प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. त्यामुळे उपलब्ध जागेसाठी विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. (प्रतिनिधी)
वेळापत्रक...
- पहिली गुणवत्ता यादी - १२ जुलै
- प्रवेश निश्चिती कालावधी -
१८ ते २१ जुलै
- दुसरी कॅप राउंड- २५ जुलै
- कॅप राउंडसाठी आॅनलाइन फॉर्म नोंदणी आणि प्रवेश निश्चिती -
२८ ते ३० जुलै
- दुसरी कॅप राउंड आणि गुणवत्ता यादी- ४ आॅगस्ट
- प्रवेश निश्चिती- ५ ते ९ आॅगस्ट
- तिसऱ्या कॅप राउंडसाठी जागा जाहीर- १२ आॅगस्ट
- उपलब्ध जागांसाठी समुपदेशन - १८ आॅगस्ट
- प्रवेश निश्चिती-
१९ ते २३ आॅगस्ट
- उपलब्ध जागा जाहीर -
२६ आॅगस्ट