राज्यात गेल्यावर्षी रस्ते अपघातामध्ये २४,९७१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:09 AM2021-09-16T04:09:48+5:302021-09-16T04:09:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहनांबरोबरच रस्ते अपघाताच्याही घटना घडतात. गेल्यावर्षी २४ ...

24,971 people were killed in road accidents in the state last year | राज्यात गेल्यावर्षी रस्ते अपघातामध्ये २४,९७१ जणांचा मृत्यू

राज्यात गेल्यावर्षी रस्ते अपघातामध्ये २४,९७१ जणांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहनांबरोबरच रस्ते अपघाताच्याही घटना घडतात. गेल्यावर्षी २४ हजार ९७१ अपघात झाले. यामध्ये अपघातात ११,५६९ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अपघात ९ टक्के, अपघाती मृत्यू १० टक्के आणि जखमींच्या संख्येत ३७ टक्के घट झाली, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.

वाढते अपघात आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून, त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. राज्यात २०१८ मध्ये १३ हजार २६१, तर २०१९ मध्ये १२ हजार ७८८ अपघाती मृत्यू झाले होते.

महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये १०० अपघातामागे ४६.३ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक अपघात (३०७२ ) आणि अपघात मृत्यू (१४६२) हे डिसेंबर २०२० मध्ये झाले आहेत. कारण कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडले होते, तर सर्वांत अपघातामध्ये (५७२) आणि अपघाती मृत्यूमध्ये (३०३) सर्वाधिक घट एप्रिल २०२० मध्ये झाली आहे.

Web Title: 24,971 people were killed in road accidents in the state last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.