मुंबई : दिल्लीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ अशी ओळख असलेल्या मुंबईविमानतळावरून एप्रिल ते सप्टेंबर अशा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत दोन कोटी ६६ लाख ८० हजार लोकांनी प्रवास केला आहे.
गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रवासी संख्येत झालेली ही वाढ ५.३ टक्के अधिक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत ३ टक्के वाढ झाली, तर आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत ११ टक्के वाढ झाली आहे. या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावर १ लाख ६३ हजार ९७३ विमानांची वाहतूक झाली. यात देखील ३ टक्के वाढ दिसून आली आहे.
विक्रमी प्रवासी संख्याही हाताळलीआंतरराष्ट्रीय मार्गांवर एकूण ४४ हजार १४३ विमानांची वाहतूक झाली, तर देशांतर्गत मार्गावर १ लाख १९ हजार ८३० विमानांची वाहतूक झाली. २८ सप्टेंबर या एका दिवशी मुंबई विमानतळाने १ लाख ६४ हजार ६१७ अशी विक्रमी प्रवासी संख्या हाताळली. दरम्यान, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये दिल्ली विमानतळावरून २ कोटी ५३ लाख ३० हजार प्रवाशांनी प्रवास केला.