Join us  

खाऊसाठी अडीच कोटींचा खर्च

By admin | Published: June 21, 2014 10:43 PM

महापालिका शाळेत मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असताना मध्यान्ह जेवणाव्यतिरिक्त पूरक पोषण आहारावर पालिका अडीच कोटी रुपये खर्च करणार आहे.

सदानंद नाईक - उल्हासनगर
महापालिका शाळेत मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असताना मध्यान्ह जेवणाव्यतिरिक्त पूरक पोषण आहारावर पालिका अडीच कोटी रुपये खर्च करणार आहे. या ठरावाला मनसेसह सर्व स्तरांतून विरोध होत असून, मनसेने शैक्षणिक साहित्यासह मूलभूत सुविधा देण्याची मागणी केली आहे.
उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळांतर्गत विविध माध्यमांच्या 28 शाळा असून 9 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मंडळातील सावळ्या गोंधळामुळे गेल्या वर्षी गुजराती व सिंधी माध्यमाच्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप दिवाळीत झाले आहे.  तसेच शाळा इमारती 5क् वर्षापूर्वीच्या जुन्या असल्याने बहुतेक शाळांना गळती लागली आहे.
महापालिका शिक्षण मंडळ नेहमी वादात राहिले असून मूलभूत सुखसुविधांकडे दुर्लक्ष करीत आहे.  मंडळ, पाणी मशिन घोटाळा, संगणक घोटाळा, डेक्स बेंच खरेदी घोटाळ्यामुळे वादात राहिले असून मंडळाची याबाबत चौकशी झाली आहे.  तसेच लहाने जळीत प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.  गेल्या महिन्यात एका महिलेने तत्कालीन प्रशासन अधिकारी रामदास बिडवे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. शासनातर्फे मध्यान्ह जेवण शाळा विद्याथ्र्याना दिले जाते. मात्र याव्यतिरिक्त पूरक पोषण आहार देण्याच्या ठरावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.  मध्यान्ह जेवणातच सुधारणा आणून शाळा इमारती बांधणो,  वेळेवर व नियमित शैक्षणिक साहित्य देण्याची गरज असल्याचे मत मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बंडु देशमुख यांनी व्यक्त केले आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मनसेने केल्याने खळबळ उडाली आहे.                              
 
च्महापालिकेचे एलबीटी उत्पन्न दरमहा 13 कोटींवरून 3 कोटींवर आल्याने, जुलै महिन्यात पालिका एमआयडीसीचे पाणी बिल भरू शकत नसल्याने पाणीपुरवठा बंद होतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच 
कर्मचा:यांच्या पगारावरही गंडांतर येणार असल्याचे संकेत पालिका अधिका:यांनी दिले आहेत. मालमत्ता कर वसुली व एलबीटी उत्पन्न हे दोन प्रमुख उत्पन्नाचे स्नेत पालिकेचे असून एलबीटीचे उत्पन्न वाढण्याऐवजी 13 वरून 3 कोटींवर आले आहे.
 
च्महापालिका आर्थिक डबघाईला आली असून कोण्या एकाच्या फायद्यासाठी मध्यान्ह जेवण असतानाही पूरक पोषक आहाराच्या नावाखाली अडीच कोटी रुपये खर्च करणार आहे.  पालिका शाळेतील विद्याथ्र्याना मध्यान्ह जेवण मिळत असून त्यांना शैक्षणिक साहित्य, गुणवत्तायुक्त शिक्षण, अत्याधुनिक इमारत आदींची गरज असल्याचे मत मनसेने व्यक्त केले आहे.