२५ दिवसांत १ लाख ६८ हजार जणांनी भरला सव्वा तीन कोटी दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:06 IST2021-03-19T04:06:08+5:302021-03-19T04:06:08+5:30

विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांची कारवाई २५ दिवसांत १ लाख ६८ हजार जणांनी भरला सव्वा तीन कोटी दंड विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध ...

In 25 days, 1 lakh 68 thousand people paid a quarter of a crore fine | २५ दिवसांत १ लाख ६८ हजार जणांनी भरला सव्वा तीन कोटी दंड

२५ दिवसांत १ लाख ६८ हजार जणांनी भरला सव्वा तीन कोटी दंड

विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांची कारवाई

२५ दिवसांत १ लाख ६८ हजार जणांनी भरला सव्वा तीन कोटी दंड

विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळात विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध पालिकेबरोबर पोलिसांकडूनही धडक कारवाई सुरू आहे. गेल्या महिनाभरात १ लाख ६८ हजार ८९० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत पालिकेने ३ कोटी ३७ लाख रुपयांचा दंड वसूल केला.

मुंबई पोलिसांनी २० फेब्रुवारी २०२० ते २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध ११ हजार ७४२ गुन्हे नोंद केले. त्यानंतर २० फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू केलेल्या कारवाईत दंड वसूल करण्यास सुरुवात करण्यात आली. पोलिसांकडून गर्दीची ठिकाणे, बाजार, पर्यटन स्थळ, रेल्वे, बस स्थानक तसेच रहिवासी इमारतींबरोबर झोपडपट्टी भागात विनामास्क फिरणाऱ्यांची धरपकड सुरू आहे. त्यांच्याकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. गेल्या २५ दिवसांत पोलिसांनी १ लाख ६८ हजार ८९० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. आतापर्यंतच्या कारवाईत त्यांनी ३ कोटी ३७ लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली.

पालिकेच्या पावती पुस्तकाद्वारे दंड वसूल करण्यात आला. यातील अर्धी रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी देण्यात येईल.

* यापूर्वीची कारवाई

मुंबई पोलिसांनी २० फेब्रुवारी २०२० ते २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध ११ हजार ७४२ गुन्हे नोंद केले.

* आतापर्यंत मुंबईकरांविरुद्ध २७ हजार ८४४ गुन्हे

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लागू केलेल्या विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २७ हजार ८४४ गुन्हे नोंद करण्यात आले. यात, कोरोनासंबंधित ३३९ गुन्हे नोंद आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी ११ हजार २१४ गुन्हे पोलीस दफ्तरी नोंद करण्यात आले.

....

Web Title: In 25 days, 1 lakh 68 thousand people paid a quarter of a crore fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.