Join us  

बीकेसीत धावणार २५ हायब्रीड बस

By admin | Published: March 22, 2016 3:40 AM

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून तब्बल २५ विद्युत/हायब्रीड वातानुकूलित बसची खरेदी करण्यात येत असून, या बस वांद्रे-कुर्ला संकुलापासून वांद्रे

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून तब्बल २५ विद्युत/हायब्रीड वातानुकूलित बसची खरेदी करण्यात येत असून, या बस वांद्रे-कुर्ला संकुलापासून वांद्रे, कुर्ला आणि शीव या रेल्वे स्थानकांपर्यंत धावणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान यांनी सोमवारी टाटा मोटर्स लिमिटेडला २५ हायब्रीड बस खरेदी करण्यासाठीचे खरेदी पत्र दिले आहे. ३२ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या बसची असून, या बस वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. संकुलातील बससाठी राखून ठेवलेल्या मार्गिकांमधून या बस प्रवास करतील.एमएमआरडीएने पुढाकार घेतलेल्या ‘क्वीन फ्युएल’ या उपक्रमांतर्गत बस खरेदी करण्यात येत असून, स्मार्ट बीकेसी प्रकल्पास अनुरूप असा हा प्रकल्प आहे. २५० कोटींच्या या प्रकल्पासाठी केंद्राने तांत्रिक आणि अंशत: आर्थिक पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)प्रकल्पाची वैशिष्ट्येअजवड उद्योग मंत्रालयाच्या धोरणांतर्गत हाती घेण्यात आलेला देशातील हा पहिला प्रकल्प आहे.धोरणांतर्गत हायब्रीड बसची खरेदी करणारी एमएमआरडीए ही देशातील पहिलीच सरकारी संस्था. अशा प्रकाराच्या बस तयार करणारी टाटा मोटर्स लिमिटेड पहिली कंपनी ठरणार आहे.पुढील पाच वर्षे या बसची देखभाल टाटा मोटर्स करणार आहे.या बस आपल्या नेहमीच्या ताफ्यात सामील करून चालविण्याचे बेस्टने तत्त्वत: मान्य केले आहे.चाचणी आणि अभिप्रायासाठी पहिली बस तीन महिन्यांत उपलब्ध होणार आहे. उर्वरित बस त्यापुढील काळात रस्त्यांवर धावू लागतील.