पी दक्षिण विभाग कार्यालयाच्या गच्चीवर 25 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

By मनोहर कुंभेजकर | Published: April 29, 2023 07:06 PM2023-04-29T19:06:04+5:302023-04-29T19:06:36+5:30

दरमहा 3000 युनिट्सची निर्मिती, 27000 रुपयांच्या बचतीसह पर्यावरण पूरकताही ज़पणार 

25 KW solar power plant commissioned on rooftop of P South Division Office | पी दक्षिण विभाग कार्यालयाच्या गच्चीवर 25 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

पी दक्षिण विभाग कार्यालयाच्या गच्चीवर 25 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

 मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव पश्चिम एस.व्ही.रोड येथील पी दक्षिण विभागाने पर्यावरण पूरकता व ऊर्जा बचत साध्य करण्याच्या उद्देशाने विभाग कार्यालयाच्या गच्चीवर परिमंडळ 4 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सौर ऊर्जा यंत्रणा नुकतीच कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेद्वारे उपलब्ध होणाऱ्या विद्युत ऊर्जेचा वापर विभाग कार्यालयासाठीच करण्यात येणार असून यामुळे दरमहा सुमारे 27000 इतक्या रुपयांची बचत करणे शक्य होणार आहे, अशी माहिती या  विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी लोकमतला दिली. पश्चिम उपनगरातील पालिकेच्या विभाग कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेला हा पहिलाच पर्यावरण पूरक प्रकल्प आहे. 

संपूर्ण जगात सद्यस्थितीत असणाऱ्या बऱ्याच अडचणीचा विचार करता,भविष्यामध्ये वीज निर्मितीसाठी  पर्यावरणपूरक वीज निर्मिती करणाऱ्या विविध स्तोत्रांचा वापर करणे आवश्यक आहे. वीज वाचवण्यासह पर्यावरण पूरकता जपणे आणि पर्यावरण पूरक ऊर्जेचा वापर करण्याबाबत जनजागृती साधणे, हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे राजेश अक्रे यांनी सांगितले.

येथील विभाग कार्यालयात वीज पुरवठा हा टाटा पॉवर प्रा.लि. मार्फत करण्यात येतो.या व्यतिरिक्त येथील इमारतीच्या टेरेस वर 25 किलोवॅट क्षमतेचा ऑनग्रीड रुफ टॉप सोलर पॉवर प्लॅन्ट बसवण्यात येवून,त्याद्वारे होणाऱ्या सौरऊर्जेचा वापर करून विद्युत पुरवठयाची  व्यवस्था करण्यात आली आहे.

पी दक्षिण विभाग इमारतीत 25 किलोवॅट ऑन-ग्रीड सोलर रूफटॉप प्लांटचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करणे विशेष (इनोव्हेटिव्ह) प्रकल्प निधी अंतर्गत अक्षय ऊर्जा निर्मिती  प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

 तपशील खालिल प्रमाणे

सोलर प्लांटची क्षमता - 25 किलोवॅट -
 सौर पॅनेलची संख्या -46 संख्या - प्रत्येक सौर पॅनेलची क्षमता -545 वॅट -
 सौर पॅनेलचे आयुष्य - 25 वर्षे 
-वार्षिक युनिट्सची निर्मिती (KWHr)-36000 युनिट्स, म्हणजेच दरमहा 3000 युनिट्सची निर्मिती युनिटमध्ये मासिक बचत -3000 युनिट्स - 9 रुपये प्रति युनिट शुल्क विचारात घेऊन मासिक बचत = 3000 x 9.00 = रु.27000/- - 
वार्षिक बचत रक्कम = रु.3,24,000/-
 सामान्य - प्रकल्पाची किंमत - रु. 21,95,050/- - वर्षांमध्ये प्रकल्प खर्चाची वसुली - 5 वर्षे

Web Title: 25 KW solar power plant commissioned on rooftop of P South Division Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज