Join us

मुंबईतील 10 विधानसभांसाठी 25 लाख 32 हजार मतदार, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ४२,३८७ मतदारांची भर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 11:08 AM

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामध्ये मुंबई शहर जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 

अमर शैला -मुंबई : राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार असून, त्यासाठी मुंबईतील दहा जिल्ह्यांमध्ये २५ लाख ३२ हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या मतदार नोंदणीमध्ये ४२ हजार ३८७ एवढी भर पडली असून, या वाढलेल्या मतदारांमध्ये २४ हजार ८२२ महिला मतदारांचा समावेश आहे. मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामध्ये मुंबई शहर जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 

या १० विधानसभा मतदारसंघांत मिळून सद्य:स्थितीत २५,३२,६२५ मतदारांची नोंदणी झाली आहे. यात १३,६१,५१४ पुरुष मतदारांचा तर ११,७०,८६७ महिला मतदारांचा समावेश आहे. तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या २४४ एवढी आहे. तर लोकसभा निवडणुकीसाठी २४,९०,२३८ मतदारांची नोंदणी झाली होती. त्यात १३,४३,९६९ पुरुष मतदार, तर ११,४६,०४५ महिला मतदारांचा समावेश होता. 

त्याचबरोबर तृतीयपंथीय मतदारांची संख्या २२४ एवढी होती. त्यामुळे विधानसभेसाठी पुरुष मतदारांची संख्या १७,५४५ वाढली असून त्या तुलनेत महिला मतदारांच्या संख्येत अधिक वाढ झाली आहे. विधानसभेसाठी महिला मतदारांची संख्या २४,८२२ने वाढली आहे तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या २०ने वाढली आहे.

लोकसभा -मतदारसंघ    पुरुष    महिला    अन्य    एकूणधारावी    १,४२,१४५    १,११,०३४    ३७    २,५३,२१६ सायन कोळीवाडा    १,५३,१४१    १,२२,०६१    ७७    २,७५,२७९ वडाळा    १,०४,२९६    ९७,९५८    २    २,०२,२५६ माहीम    १,११,८२७    १,११,४२७    ६५    २,२३,३१९ वरळी    १,४२,८४८    १,१७,१२६    ४    २,५९,९७८ शिवडी    १,४५,९३२    १,२५,४२९    ५    २,७१,३६६ भायखळा    १,३४,५२६    १,१७,३८९    ७    २,५१,९२२ मलबार हिल    १,३३,३३१    १,२३,५५७    ११    २,५६,८९९ मुंबादेवी    १,२७,१२७    १,०९,०९४    ८    २,३६,२२९ कुलाबा    १,४८,७९६    १,१०,९७०    ८    २,५९,७७४ एकूण    १३,४३,९६९    ११,४६,०४५    २२४    २४,९०,२३८

विधानसभा -मतदारसंघ    पुरुष    महिला    अन्य    एकूणधारावी    १,४५,३१०    १,१५,१५४    ३८    २,६०,५०२ सायन कोळीवाडा    १,५५,३३०    १,२५,५९४    ७८    २,८१,००२ वडाळा    १,०५,३१५    ९९,४५१    २    २,०४,७६८ माहीम    १,१२,५९६    १,१२,६०४    ७८    २,२५,२७८ वरळी    १,४४,१५२    १,१९,४२७    ६    २,६३,५८५ शिवडी    १,४६,६४०    १,२७,१६३    ५    २,७३,८०८ भायखळा    १,३६,९६८    १,२०,७१०    ७    २,५७,६८५ मलबार हिल    १,३५,०५३    १,२५,४०८    १२    २,६०,४७३ मुंबादेवी    १,२९,१५५    १,११,७६७    ९    २,४०,९३१ कुलाबा    १,५०,९९५    १,१३,५८९    ९    २,६४,५९३ एकूण    १३,६१,५१४    ११,७०,८६७    २४४    २५,३२,६२५

 

 

टॅग्स :निवडणूक 2024