महापालिकेकडून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला २५ लाखांची मदत

By admin | Published: August 20, 2015 10:10 PM2015-08-20T22:10:10+5:302015-08-20T22:10:10+5:30

मुंबई: अंदमान पोर्ट ब्लेअर येथे आयोजित केलेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाला महापालिकेने २५ लाखांची मदत करण्याचा निर्णय महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

25 lakhs aid from NMC for the fourth World Marathi Sahitya Sammelan | महापालिकेकडून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला २५ लाखांची मदत

महापालिकेकडून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला २५ लाखांची मदत

Next
ंबई: अंदमान पोर्ट ब्लेअर येथे आयोजित केलेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाला महापालिकेने २५ लाखांची मदत करण्याचा निर्णय महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
खासदार राहुल शेवाळे यांनी महापौर आंबेकर यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी असे नमूद केले होते की, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळांनी आयोजित केलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलानाला आर्थिक सहाय्य करण्या करता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तरी हा निधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळास देण्याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेला घेऊन मागणी मंजूर करावी. यानुसार, बुधवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत पत्र चर्चेस आणले. आणि संमेलनासाठी २५ लाखांचा निधी मंजूर झाला.

Web Title: 25 lakhs aid from NMC for the fourth World Marathi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.