लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात येणार असून, शहर उपनगरातून दहावी, बारावी आणि संघटनांचे असे ६३२ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मंडळाकडे पाठविले आहेत.
विविध क्रीडा प्रकारांतील जास्तीत जास्त खेळाडू घडावेत, तसेच खेळाडूंना विविध विभागात खेळण्याची संधी मिळावी, यासाठी सरकारच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या सवलतीच्या गुणांमुळे मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राचे गुण मिळावेत, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांकडून क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तपशील क्रीडा अधिकारी कार्यालयाने मागविला होता.
दहावीचे ३०० हून अधिक प्रस्ताव शहरातील विविध शाळांकडून प्राप्त झालेले दहावीच्या ३४५ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव परीक्षा मंडळाकडे पाठविले आहेत.
बारावीचे २८७ प्रस्ताव बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थी खेळाडूंनाही क्रीडा गुण असतात. क्रीडा अधिकारी कार्यालयाने बारावीत शिकणाऱ्या मुंबईतील २८७ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मंडळाकडे पाठविले आहेत.
गुणांपासून वंचित राहिल्यास कारवाईविविध खेळांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना परीक्षा मंडळाकडून क्रीडा गुण मिळणे आवश्यक आहे. खेळाडू, विद्यार्थी अशा गुणांपासून वंचित राहू नयेत, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. बोर्डाकडे आलेल्या प्रस्तावाची पडताळणी करून विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात येणार आहेत.
खेळाडू विद्यार्थ्यांना २५ गुणांपर्यंत वाढजिल्हास्तरीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना १५ गुण, विभागस्तरावरील यशस्वी विद्यार्थ्यांना १० गुण, राज्यस्तरावरील यशस्वी खेळाडूंना १५ गुण, तर राष्ट्रीय स्तरावर यश मिळविलेल्या खेळाडूंना २५ गुण दिले जातात.
उपनगरांतून अधिक प्रस्तावदहावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा गुण मिळण्यासाठी उपनगरातील शाळांकडून सर्वाधिक प्रस्ताव हे क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.