४८ तासांत २५ प्रवाशांचा मृत्यू

By admin | Published: March 18, 2016 02:40 AM2016-03-18T02:40:52+5:302016-03-18T02:40:52+5:30

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील ४८ तासांत झालेल्या विविध अपघातांत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यातील सात जणांचा ठाणे, डोंबिवली, कल्याण लोहमार्ग

25 passengers die in 48 hours | ४८ तासांत २५ प्रवाशांचा मृत्यू

४८ तासांत २५ प्रवाशांचा मृत्यू

Next

डोंबिवली : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील ४८ तासांत झालेल्या विविध अपघातांत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यातील सात जणांचा ठाणे, डोंबिवली, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मृत्यू झाला. यातही, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या वांगणी-बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा-गुरवलीदरम्यान पाच अपघात घडले.
१५ मार्चला दिवसभरात १७ अपघात झाले. १६ मार्चला आठ जणांचा अपघाती मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. खडवली-टिटवाळा मार्गावर फाटक क्रमांक ५२ दरम्यान अजय तरे या बाइकस्वाराचा एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झाला. बदलापूर -वांगणीदरम्यान ऋतुजा शेटे चा मृत्यू झाला. कल्याण-शहाड मार्गावर गाडीतून पडल्याने उमंग यादव (१९, रा. टिटवाळा पश्चिम) याला प्राण गमवावे लागले. नरेश ठाकूर (५५) रेल्वे अपघातात जखमी झाले होते. जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
१६ मार्चला बदलापूर स्थानकादरम्यान अनोळखी व्यक्ती बेशुद्ध आढळली. तर, दुसऱ्या घटनेत सागर माने (२०, रा. उल्हासनगर) याचा गाडीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. १४ मार्चलाही असेच मृत्यू झाले. गुरुवारी किती अपघात झाले, याचा तपशील मिळू शकला नाही.

Web Title: 25 passengers die in 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.