बेस्टच्या 25 टक्के बसगाडय़ा नादुरुस्त

By admin | Published: November 12, 2014 02:26 AM2014-11-12T02:26:50+5:302014-11-12T02:26:50+5:30

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील तब्बल 25 टक्के बसगाडय़ा गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी पडून असल्याची धक्कादायक बाब बेस्ट समितीच्या बैठकीत आज उघडकीस आली़

25 percent of busiest buses are poor | बेस्टच्या 25 टक्के बसगाडय़ा नादुरुस्त

बेस्टच्या 25 टक्के बसगाडय़ा नादुरुस्त

Next
मुंबई :  बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील तब्बल 25 टक्के बसगाडय़ा गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी पडून असल्याची धक्कादायक बाब बेस्ट समितीच्या बैठकीत आज उघडकीस आली़ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच बसगाडय़ांची ही अवस्था असल्याचा हल्ला सदस्यांनी चढविला़ यामुळे संतप्त महाव्यवस्थापकांनी माहिती घेऊन बोलत जा, असे प्रत्युत्तर सदस्यांना दिल़े 
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात 42क्क् बसगाडय़ा आहेत़ मात्र यापैकी 9क्क्हून अधिक बसगाडय़ा बंद पडलेल्या असून गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या आहेत, असे बेस्ट समिती सदस्यांनी निदर्शनास आणल़े गाडय़ा कमी असल्यामुळे बस स्टॉपवर प्रवाशांची प्रतीक्षा वाढली आह़े याचा परिणाम उत्पन्नावरही होत असल्याचा संताप सदस्यांनी व्यक्त केला़ ढिसाळ कारभारामुळे आज बेस्टची अशी अवस्था असल्याचा आरोप मनसेचे केदार हुंबाळकर यांनी केला़ मात्र हा घाव महाव्यवस्थापकांच्या जिव्हारी लागला़ त्यामुळे त्यांनीही आक्रमक भूमिका घेत टीका करण्यापूर्वी माहिती घेऊन बोलत जा, असे खडेबोल सुनावल़े मात्र बेस्टच्या 75क् बस दुरुस्तीस 
उभ्या असल्याचे प्रशासनाने कबूल केल़े (प्रतिनिधी)
 
च्नवीन बसगाडीचा सांगाडा उभा करण्यास 5 लाखांचा खर्च येतो़ तसेच त्याची आयुर्मर्यादाही 1 वर्षाहून अधिक असत़े परंतु नादुरुस्त 
बसगाडी दुरुस्तीसाठी अडीच लाख रुपये खर्च येत असून, 12 महिन्यांची गॅरेंटी देण्यात येत असल्याचा संताप सदस्यांनी व्यक्त केला़
 
च्बसची दुरुस्ती खासगी कंपन्यांकडून करण्यापेक्षा आगारातील कामगारांनाच काम द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे सुहास सामंत यांनी केली़ मात्र एका वेळच्या कामास कामगार लावल्यास नवीन भरतीची मागणी संघटना करतील़ त्यामुळे अशी मागणी करणार नाही, अशी हमी आधी द्या, अशी गुगली महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी टाकली़
 
च्प्रत्येक महिन्यात 12क् ते 14क् बसगाडय़ा नादुरुस्त होत होत्या़ मात्र आता हे प्रमाण 9क् वर आले असल्याचा बचाव प्रशासन करीत आह़े

 

Web Title: 25 percent of busiest buses are poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.