लिपिक पदावर पदोन्नतीस मिळणार २५ टक्के आरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 05:51 AM2018-12-07T05:51:49+5:302018-12-07T05:52:11+5:30
राज्य परिवहन महामंडळातील चालक, वाहक, साहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता एसटीच्या लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी आरक्षण मिळणार आहे.
मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील चालक, वाहक, साहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता एसटीच्या लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी आरक्षण मिळणार आहे. या कर्मचाºयांच्या पदोन्नतीसाठी लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी गुरुवारी दिली.
चालक, वाहक, साहाय्यक, शिपाई, नाईक, हवालदार, उद्वाहन चालक, मजदूर, परिचर, खानसामा, अतिथ्यालय परिचर, सफाईगार, सुरक्षारक्षक, खलाशी, साहाय्यक माळी, माळी व स्वच्छक या पदावरील कर्मचाºयांना या निर्णयाचा लाभ होईल. राज्यात या पदावर सुमारे १ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी विहीत शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे कर्मचारी लिपिक-टंकलेखक पदासाठी पात्र ठरतील.
या निर्णयामुळे महामंडळातील ज्या कर्मचाºयांनी लिपिक, टंकलेखक पदासाठी आवश्यक शिक्षण घेतले आहे त्यांचे शिक्षण वाया न जाणार नाही. उलट आता त्यांना एसटी महामंडळातच पदोन्नतीची संधी मिळणार आहे, असे रावते यांनी सांगितले.