विकासावर २५ टक्केच खर्च

By admin | Published: January 30, 2016 03:41 AM2016-01-30T03:41:28+5:302016-01-30T03:41:28+5:30

पुढचे वर्ष निवडणुकीचे असल्याने विकासकामांचे उद्घाटन करत ‘करून दाखविल्याचा’ गवगवा सत्ताधारी सुरू करतील़ नाक्यानाक्यावर नारळ वाढवून कामाचे मोठे फलक लावण्याची

25 percent spend on development | विकासावर २५ टक्केच खर्च

विकासावर २५ टक्केच खर्च

Next

- शेफाली परब-पंडित,  मुंबई
पुढचे वर्ष निवडणुकीचे असल्याने विकासकामांचे उद्घाटन करत ‘करून दाखविल्याचा’ गवगवा सत्ताधारी सुरू करतील़ नाक्यानाक्यावर नारळ वाढवून कामाचे मोठे फलक लावण्याची चढाओढ नगरसेवकांमध्ये सुरू होईल़ प्रत्यक्षात मात्र अर्थसंकल्पातील २५ टक्के रक्कमच आतापर्यंत विकासकामांवर खर्च झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प एखाद्या छोट्या राज्याच्या अर्थसंकल्पाच्या तोडीचा असतो़ यात शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा, पायाभूत प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली जाते़ दरवर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे़ परंतु अर्थसंकल्पातील तरतुदीतून ५० टक्क्यांहून कमी रक्कम दरवर्षी खर्च होते उर्वरित तरतूद वाया जात असल्याचे उजेडात आले आहे़
२०१५ ते २०१६ या आर्थिक वर्षात ११ हजार ८२३ कोटी रुपये पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहेत़ ३१ मार्च २०१६ पर्यंत ही तरतूद खर्च होणे अपेक्षित आहे़

अर्थसंकल्प
३ फेब्रुवारीला
२०१६ ते २०१७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे़ २०१७ मध्ये महापालिका निवडणुका असल्याने या अर्थसंकल्पातून मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न निश्चितच होईल़ त्यातच भाजपाने वेगळी चूल मांडण्याची तयारी केली असल्याने शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे़

निधी वाढवूनही अग्नी सुरक्षा वाऱ्यावर
उत्तुंग इमारतींमध्ये आगीचा धोका अधिक वाढला असल्याचे आढळून आले आहे़ मात्र इमारतींच्या उंचीपुढे अग्निशमन दलाच्या शिड्या तोकड्या पडू लागल्या आहेत़ त्यामुळे मुंबईकरांच्या अग्नी सुरक्षेसाठी अग्निशमन दलास गतवर्षीच्या तुलनेत निधी वाढवून देण्यात आला़ १६० कोटींमध्ये वाढ करीत २०१५ ते २०१६ या आर्थिक वर्षात २४७ कोटी या विभागाच्या वाट्याला आले़ मात्र यापैकी आतापर्यंत १८ टक्के निधी खर्च झाला आहे़ या विभागातील चार प्रमुख अधिकारी काळबादेवीच्या दुर्घटनेत शहीद झाले़ या दुर्घटनेनंतर या विभागामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री वाढविण्याची मागणी होत होती़ प्रत्यक्षात अर्थसंकल्पातील तरतूदही पूर्णपणे खर्च झालेली नाही़

स्वच्छता अभियानाला हरताळ : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेने सफाई मोहीम मुंबईभर सुरू केली़ त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले़ मात्र या विभागातही ३७८ कोटींपैकी ४५ कोटी म्हणजेच १२ टक्के रक्कम खर्च झाली आहे.

२८ जानेवारी २०१६ पर्यंत २५़४९ टक्के रक्कम विकासकामांवर खर्च झाली आहे़ यात आरोग्यावर आठ टक्के, माहिती तंत्रज्ञान विभागात तीन टक्के, स्वच्छ मुंबई अभियान राबविणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये १२ टक्के खर्च करण्यात आले आहेत़

माहिती तंत्रज्ञानाचे तीनतेरा
पालिकेला हायटेक करण्यासाठी प्रशासनाने अधिकारी व नगरसेवकांना लॅपटॉप, पेपरलेस कारभार, ई-निविदा पद्धत अवलंबिली़ मात्र माहिती तंत्रज्ञान खात्यासाठी राखीव निधीपैकी आठ टक्केच खर्च गेल्या वर्षी खर्च झाला होता़ चालू आर्थिक वर्षात यामध्ये घसरण झाली असून जेमतेम ३़३७ टक्के माहिती तंत्रज्ञानासाठी खर्च झाले आहेत़

‘नेमके काय करून दाखवले?’
कराच्या स्वरूपात करदात्यांच्या खिशातून पैसे काढल्यानंतर त्यापैकी केवळ २५ टक्केच विकासकामांवर खर्च होत आहेत.सत्ताधारी व प्रशासनाने मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, शिवसेनेने नेमके काय करून दाखविले, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला आहे़


२८ जानेवारी २०१६ पर्यंत
विकासकामांवर खर्च
विभाग तरतूदखर्चटक्केवारी
घनकचरा ३७८़६६ ४५़४३१२
पर्जन्य जलवाहिन्या ११०५२३३२१
अग्निशमन दल२४७़२७४४़८११८
उद्यान ४२६११२२८
बाजार ३७१४३७
रस्ते, वाहतूक३२०७११११३४
आरोग्य २२६१६७़२३
पूल ६०२१२५२०
एकूण ११८२३/३०१४२५़७९
आकडेवारी कोटींमध्ये

Web Title: 25 percent spend on development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.