‘राज्यात २५ हजार सौर कृषिपंप ३१ मार्चपूर्वी’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:46 AM2019-03-04T05:46:07+5:302019-03-04T05:46:15+5:30

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत ७३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत.

25 thousand solar pumps in the state before 31st March ' | ‘राज्यात २५ हजार सौर कृषिपंप ३१ मार्चपूर्वी’

‘राज्यात २५ हजार सौर कृषिपंप ३१ मार्चपूर्वी’

Next

मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत ७३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. येत्या ३१ मे पूर्वी २५ हजार सौर कृषिपंप आस्थापित करावे, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणला नुकतेच दिले.
सौर कृषिपंपाला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता ४० टक्के पंप मराठवाडा व उर्वरित विभागात प्रत्येकी १५ टक्के याप्रमाणे पंप आस्थापित करावे. अनुसुचित जाती-जमातीचे पंप प्रमाणपत्राच्या आधारे मंजूर करावे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंप मंजूर झाले आहेत. त्या शेतकºयांची यादी संबंधित खासगी एजन्सीला देण्यात येणार आहेत. विविध एजन्सीच्या माध्यमातून हे पंप लवकरात लवकर आस्थापीत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ८ मार्चंपर्यत जास्तीत जास्त पंप आस्थापीत करण्याचा प्रयत्न महावितरणचा आहे.
दरम्यान, पंप आस्थापीत झाल्यापासून ५ वर्षापर्यंत देखभाल दुरुस्तीची हमी पंप आस्थापित करणाºया एजन्सीची राहणार आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.

Web Title: 25 thousand solar pumps in the state before 31st March '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.