एअर इंडियाकडे प्रवाशांचे २५० कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:09 AM2021-09-12T04:09:28+5:302021-09-12T04:09:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई कोरोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बऱ्याच विमानांच्या फेऱ्या ऐनवेळी रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांचे तिकीट शुल्क ...

250 crore passengers stuck with Air India | एअर इंडियाकडे प्रवाशांचे २५० कोटी अडकले

एअर इंडियाकडे प्रवाशांचे २५० कोटी अडकले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

कोरोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बऱ्याच विमानांच्या फेऱ्या ऐनवेळी रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांचे तिकीट शुल्क विमान कंपन्यांकडे अडकले आहे. तर बऱ्याच कंपन्यांनी ते परतही केले. मात्र, एअर इंडियाकडे आजही प्रवाशांचे तब्बल २५० कोटी रुपये अडकून पडले आहेत. यामध्ये देश-विदेशातील अनेक प्रवाशांचा समावेश असून, येत्या काही दिवसात परतावा देण्याची ग्वाही एअर इंडिया प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दुसऱ्या लाटेमुळे एअर इंडियाच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. तरीही जुलै महिन्यात १३० कोटी रुपयांचा परतावा मंजूर करण्यात आला आहे. तो प्रवाशांपर्यंत जलदगतीने पोहोचविण्यासाठी योजना आखली जात असल्याचे एअर इंडियाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, इंडिगोने आणि गो एअरने प्रवाशांना सर्व परतावा दिला आहे. रोख रकमेच्या व्यवस्थापनासाठी एअर इंडिया परतावा देण्यास विलंब करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: 250 crore passengers stuck with Air India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.